शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis in Thane: सावधान! जिल्ह्यात वाढत आहेत म्युकरमायकोसिसचे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 17:11 IST

११७ रुग्णांवर उपचार १० जणांचा मृत्यू; कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे, अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाणे  जिल्ह्यात आतार्पयत म्युकरमोयकोसिस या आजाराचे रुग्ण दिवासगणिक झपाटय़ाने वाढू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील काही दिवसात दुपटीने रुग्ण वाढतांना दिसत आहेत. आतार्पयत जिल्ह्यात या आजाराचे ११७ रुग्ण आढळले असून त्यातील १० जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणो दिसल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणोने दिला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना उच्च मधुमेह आहे, अशांना या आजाराची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले. परंतु आता ज्यांनी रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशांना देखील या आजाराची लागण होण्याच्या शक्यता नाकारता येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वेळीच या आजारावर योग्य ते उपचार घेणो हाच यावरील मार्ग असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनापाठोपाठ आता या आजाराने जिल्ह्यात हळू हळू डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसात तर या आजाराचे रुग्ण वेगाने वाढतांना दिसू लागले आहेत. त्यानुसार आतार्पयत जिल्ह्यात ११७ म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून आले असून त्यातील १० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. यातील तीन रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर यातील बहुसंख्य रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना दिसत आहेत.

तर यामध्ये सर्वाधिक ४० रुग्ण हे महापालिका हद्दीत आढळून आले आहेत. तर त्या खालोखाल नवी मुंबईत ३४, कल्याणमध्ये २९,  उल्हासनगर ३, भिवंडी १, मिराभाईंदर ८, अंबरनाथ १, बदलापुर १ अशा पध्दतीने या रुग्णांची संख्या आहे. सुदैवाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या आजाराचा रुग्ण अद्यापही आढळून आलेला नाही. तर रोजच्या रोज जिल्ह्यात सरासरी ११ च्या आसपास नवे रुग्ण या आजाराचे सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर या आजाराच्या ठाण्यात १, नवी मुंबईत ५ रुग्णांचा मृत्यु झाला असून कल्याणमध्ये ३ आणि उल्हासनगरमधील एकाचा यात मृत्यु झाला आहे.

औषधांचा मुबलक साठाया आजारात शासकीय रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरु असतील तर त्याला मोफत औषध उपचार केले जात आहेत. त्यासाठी लागणारा औषधा साठा ठाणे  जिल्हा शासकीय रुग्णालयात पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत देण्यात आली आहे. तज्ञ डॉक्टरांची टिम सज्जजिल्हा शासकीय रुग्णालयात अशा प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेस्थेशीया, कान, नाक, घसा तज्ञ आदींची 7 जणांची टीम सज्ज करण्यात आली आहे. तसेच चार ते पाच दंत चिकित्सक देखील उपलब्ध आहेत. तर बाहेरुन देखील तज्ञ डॉक्टरांची टीम घेतली जाणार असून न्युरो सजर्नही उपलब्ध करुन घेतला जाणार आहे.(कैलाश पवार - जिल्हा शल्यचिकि त्सक - ठाणे )

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या