शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

रंगली श्रेयवादाची लढाई, सोशल मीडियावर संदेश पाठवून दिले एकमेकांना उत्तर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 07:09 IST

शहरात बाहेरून येणाºया वाहनांमुळे होणाºया कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी उड्डाणपुलांच्या सुरू असलेल्या कामांची शिवसेना खा. राजन विचारे यांनी सोमवारी पाहणी केली. लागलीच ठाणे शहरातील भाजपाचे आ. संजय केळकर यांनी गेल्या चार महिन्यांत दोन वेळा या कामांची पाहणी केल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली.

ठाणे : शहरात बाहेरून येणाºया वाहनांमुळे होणाºया कोंडीतून सुटका मिळावी, यासाठी उड्डाणपुलांच्या सुरू असलेल्या कामांची शिवसेना खा. राजन विचारे यांनी सोमवारी पाहणी केली. लागलीच ठाणे शहरातील भाजपाचे आ. संजय केळकर यांनी गेल्या चार महिन्यांत दोन वेळा या कामांची पाहणी केल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली. त्यामुळे या उड्डाणपुलांच्या उभारणीचा श्रेयवाद येत्या काही दिवसांत कसा रंगणार, याची चुणूक सोमवारी अनुभवण्यास मिळाली.मीनाताई ठाकरे चौकामधून जाणाºया उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून हे सलग पूल दोन दिशांना उतरणार आहेत. हा पूल ३१ मे पर्यंत सुरू करण्यात येणार आहे.अल्मेडा चौक येथील हा पूल ६३६ मीटरचा असून या उड्डाणपुलाच्या कामात वंदना डेपोजवळ येथे अप व डाउन दिशेला असणाºया विकास आराखड्यातील रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम तत्काळ सुरू करावे, असे आदेश खा. विचारे यांनी नगर अभियंता यांना दिले. हा पूल ३१ मार्चपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. संत नामदेव चौक येथील हा पूल ६४७ मीटर लांबीचा असून याठिकाणीसुद्धा विकास आराखड्यात असणाºया रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. हा पूल ३० एप्रिलपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. खा. विचारे यांनी कोपरी पुलाची चौकशी केली असता या पुलाच्या निविदा सोमवारीच उघडण्यात येणार असून पात्र ठरणाºया ठेकेदारास १५ दिवसांत कार्यादेश देणार असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.कोपरी पुलाचे काम सुरू झाल्यास या पुलावरून ये-जा करणारी वाहने शहरातील तिन्ही उड्डाणपुलांवरून ठाणे-कोपरी पुलाद्वारे सर्व्हिस रोडमार्गे हायवे पूर्व द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पामध्ये भूमिगत जलवाहिनी, ‘महावितरण’च्या उच्चदाबाच्या वाहिन्या, मलवाहिन्या यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागले. काही ठिकाणी स्थलांतर करणे शक्य नसल्याने पुलाच्या पायाच्या संकल्प चित्रामध्ये आवश्यक फेरबदल करून काम करण्यात आल्याचे खा. विचारे यांनी सांगितले.या उड्डाणपुलाच्या कामाला २०१४ साली मंजुरी मिळाली असून याला एमएमआरडीएकडून २२३ कोटींचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे. हे काम महापालिकेमार्फत सुरू आहे.शिवसेना - भाजपाची अहमहमिकाच्सोमवारी सकाळी खा. विचारे यांनी केलेल्या या पाहणीचे फोटो व बातमी सोशल मीडियावर प्रसृत होताच आ. संजय केळकर यांनी याच उड्डाणपुलांच्या कामांची गेल्या चार महिन्यांत दोन वेळा पाहणी केल्याची वृत्ते सोशल मीडियावर प्रसृत केली गेली.च्हे पूल उभारले जाण्याकरिता आम्हीच कसा पाठपुरावा केला, हे सांगण्याची अहमहमिका शिवसेना व भाजपात सुरू झाली.च्विचारे व केळकर यांच्या स्वीय सहायक यांच्यातील ही जुगलबंदी निवडणुका जवळ येताच कामांचे श्रेय घेण्यावरून या दोन्ही पक्षांत कसे तुंबळ युद्ध होणार, याची साक्ष देणारी होती.च्नंतर मात्र, दोन्ही नेत्यांच्या सहायकांनी हा श्रेय घेण्याचा प्रयत्न नसल्याचा खुलासा केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा