शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बारबालेची फसवणूक करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:08 IST

बारबालेशी असलेल्या सलगीचा आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याकडून साडेसात लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा १२ लाखांचा ऐवज घेऊन पसार

ठाणे : बारबालेशी असलेल्या सलगीचा आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याकडून साडेसात लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा १२ लाखांचा ऐवज घेऊन पसार झालेल्या दीपक हरिओम बेहल (४६) या भामट्याला कासारवडवली २३ मे रोजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ७० हजारांचे नऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.कासारवडवलीतील हायपरसिटी मॉलच्या मागे राहणाºया सीमा वर्मा (३२, नावात बदल) या पूर्वाश्रमीच्या बारबालेशी दीपकची ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाल्यामुळे त्याने तिला बहीण मानले. तिच्या पाच वर्षांच्या मुलासह ते घोडबंदर रोडवरील या घरात एकत्रच वास्तव्याला होते. परिस्थितीमुळे तसेच अशिक्षितपणामुळे बारबालेसारखी नोकरी तिला पत्करावी लागली होती. पण, आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्याचे तिचे ध्येय होते. दरम्यानच्याच काळात तिची दीपकशी ओळख झाली होती. बँक किंवा इतर व्यवहारात तिला कसलीच माहिती नसल्यामुळे एक हुशार आणि विश्वासू असलेल्या दीपकला तिने तिच्याच घरात तडजोड म्हणून आसराही दिला. याने तिचा विश्वास संपादन करून तिच्याकडून तिचे एटीएमकार्ड, चेकबुक स्वत:कडे घेतले. त्याद्वारे त्याने गेल्या काही दिवसांपासून तिच्या बँक खात्यातील साडेसात लाखांची रोकड, एक लाख ४४ हजारांचे आठ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, ९० हजारांच्या अंगठ्या, ७२ हजारांच्या सोन्याच्या बांगड्या, एक लाख आठ हजारांचा सोन्याचा हार असा सुमारे १२ लाखांचा ऐवज घेऊन तो मे २०१८ च्या पहिल्या आठवड्यात पसार झाला. मुलाला शाळेत घालण्यासाठी पैशांची जमवाजमव करताना तिने बँक खाते आणि दागिन्यांची चाचपणी केली. तेव्हा पैसे आणि दागिने गायब झाल्याचे आढळले. या प्रकारानंतर हवालदिल झाल्याने तिने कासारवडवली पोलीस ठाण्यात १७ मे रोजी तक्रार केली.वपोनि दत्तात्रय ढोले, पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकातील सहा. पोलीस निरीक्षक कैलास टोकले, उपनिरीक्षक मनीष पोटे यांनी त्याला २३ मे रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने २९ मे रोजी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.