शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बारबालेची मैत्री ज्येष्ठ नागरिकास महागात पडली; मुलांसह मिळून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:18 IST

डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण करत अंगावरील सोन्याची चैन, ब्रेसलेट व अंगठी लुटून पळ काढला होता

मीरारोड - बोरिवलीला राहणारे टपाल खात्यातून निवृत्त झालेले एका ६९ वर्षीय वृद्धास बारबालेशी केलेली मैत्री महागात पडली. त्या बारबालेला तिच्या दोघामुलांसह मिळून वृद्धास डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटल्या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या काशिमीरा युनिटने अटक केली आहे.

बोरिवलीला राहणारे सदर ज्येष्ठ नागरिक यांनी दोन महिन्यापूर्वी स्वत:चे नाव अनिता (३८) असे सांगणाऱ्या बारबालेशी ओळख झाली होती. दोघंही एकमेकांच्या संपर्कात असतं. फिर्यादी नुसार अनिताने ज्येष्ठ नागरिकाकडे मुलांच्या औषधोपचारासाठी दोन हजार रुपये घेतले होते. ते पैसे परत करायचे आहेत म्हणून अनिताने ४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वा. त्यांना काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत चेकनाका येथे असलेल्या मंत्रा ऑर्केस्ट्रा बार जवळ बोलावले होते.ज्येष्ठ नागरिक रात्री तेथे थांबले असता दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण करत अंगावरील सोन्याची चैन, ब्रेसलेट व अंगठी लुटून पळ काढला होता. सदर प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास गुन्हे शाखे कडे देण्यता आला होता.

सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक अभिजित टेलर व पथकाने या प्रकरणी तपास सुरु केला. पोलिसांनी आधी तबरेज उर्फ मुन्ना आजम खान (२४) रा. बिलालपाडा, नालासोपारा याला अटक केली. त्या नंतर त्याचा भाऊ मेहताब उर्फ छोटु आजम खान (२३) रा. संतोष नगर, दिंडोशी, गोरेगाव याला पकडले. सदर कट अनिताच्या सांगण्या वरुनच रचल्याचे समोर आले. पोलीसांनी ज्योती उर्फ निलोफर उर्फ अनिता गोपाल वायफलकर (३८) हिला देखील अटक केली.अनिता ही तबरेज व मेहताबची आई असून ती घटना घडल्यावर मुळ गावी अहमदनगर येथे पळुन गेली होती. तर तबरेज याच्यावर जबरी चोरी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी आरोपीं कडुन १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना २१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.