शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारावे घनकचरा प्रकल्प : हरित लवादाने दिले पालिकेला ‘जैसे थे’चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे घनकचरा भराव भूमी प्रकल्प प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेस ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी २४ आॅगस्टला होणार आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे घनकचरा भराव भूमी प्रकल्प प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेस ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी २४ आॅगस्टला होणार आहे.महापालिकेच्या उबंर्डे आणि बारावे घनकचरा प्रकल्पास मंजुरी दिली गेली. त्याच्या निविदा मागविल्या गेल्या. निविदा मंजूर होऊन त्याचा कार्यादेशही काढला. मात्र या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पर्यावरण खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याने त्यासाठी महापालिकेने पाठपुरावा सुरू केला. महापालिकेस ६ जूनला पर्यावरण खात्याकडून ना-हरकत दाखला मिळाला. हा दाखला मिळतात राजेश लुल्ला या व्यक्तीने १० जूनला हरित लवादाकडे धाव घेऊन बारावे प्रकल्पास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. हा प्रकल्प नियमावलीचे भंग करणारा आहे, असा आरोप त्यांनी केला. लुल्ला यांच्या याचिकेवर पुण्यातील हरित लवादाकडे सुनावणी होणार होती. मात्र त्याठिकाणी खंडपीठ न बसल्याने, हे प्रकरण दिल्लीतील हरित लवादाने व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सुनावणीसाठी घेतले. त्यावर लवादाने पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश महापालिकेस देत, एकूणच स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत.बारावे व उंबर्डे येथे भरावभूमी क्षेत्र विकसित केल्याशिवाय आधारवाडी डम्पिंगवरील कचरा टाकणे बंद होणार नाही. बारावे व उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पांसंदर्भात जनसुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीने प्रकल्पास पर्यावरण खात्याचा ना-हरकत दाखला दिला आहे. जनसुनावणीदरम्यान बारावे येथील नागरिकांनी प्रकल्पास तीव्र विरोध दर्शवून जनसुनावणी उधळून लावली होती. प्रकल्प निकषांना धरून नाही. तसेच तो नागरी वस्तीपासून जवळच आहे. नागरिकांच्या विरोधानंतर भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी बारावे येथील नागरिकांसह आयुक्तांची भेट नुकतीच घेतली. आमदार पवार यांनीही प्रकल्पास विरोध केला आहे.सीएनजी प्रकल्पही उभारू नयेमहापालिका बारावे येथे सीएसआर फंडातून जैविक कचºयापासून सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प पूर्ण केला आहे. हा प्रकल्पही उभारू नये. त्यासाठीही नागरिकांचा विरोध आहे. त्याचेही काम नागरिकांनी बंद पाडले आहे. दुसरीकडे पोलिस बंदोबस्तात या प्रकल्पाचे काम सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. मात्र पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने काम रखडले आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका