शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाची आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नये, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समीतीची सुचनावली तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 16:29 IST

ठाणे जिल्हा समन्वय समितीची दुसरी बैठक पार पडली.

ठळक मुद्देठाणे जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्नदुसरी ऑनलाइन बैठक संपन्नसुचनावली करणार जाहीर

ठाणे : ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समीतीने कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ठाणे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी सूचनावली जाहीर केली. आहेत. ठाण्यातील या वर्षीचे उत्सव हे अत्यंत साधेपणाने साजरे व्हावे, आगमन मिरवणूक किंवा विसर्जन मिरवणूक काढली जाऊ नये अशा अनेक सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. 

        मुख्य पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन काही सूचना ठरविण्यात आल्या. बाप्पाचे आगमन किंवा विसर्जन करताना गरजे पुरतेच कार्यकर्ते असावेत. गणेश मंडपात सोशल डिस्टैंसिंगचे पालन करत ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते नसावेत, मंडपात प्रवेश करताना सैनिटाइजर व थर्मामीटर ची व्यवस्था असणे बंधनकारक राहील, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मास्क,ग्लोव्स सारखी सुरक्षित उपकरणें वापरने बंधनकारक राहील, श्रीं च्या आरती वेळी देखील ५ ते ६ कार्यकर्त्यांनाच मंडपात मुभा राहील, कोणतेही सत्कार समारंभ अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रम घेतले जाणार नाहीत, दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी सर्वप्रथम मंडळांची असेल, गणेश मुर्ती सोबत कोणतेही रेकॉर्डिंग शो या वेळी असणार नाहीत, मंडप दिवसातुन दोनदा निर्जंतुकीकरण करणे ही जबाबदारी प्रशासनासोबत मंडळांची देखील राहील, मंडपात विभागाजवळचे कोरोना वैद्यकीय हॉस्पिटल, ऐम्बुलेंस, डॉक्टर, पोलीस यांचे संपर्क क्रमांक बोर्ड असणे बंधनकारक राहील, कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी गणेश मुर्ती या कमीत कमी लोक निगा राखू शकतील अशी असावी, शक्यतो ध्वनिक्षेपकाचा वापर टाळावा, प्रशासन ,पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांना सर्वतोपरी सहकार्य होईल याची काळजी घ्यावी व सर्व नियम पाळावेत, उत्सव साधेपणाने पार पाड़ताना निधी उरत असेल तर हॉस्पिटल अथवा वैद्यकीय संस्था यांना ऐश्चिक मदत करावी, गणेशोत्सव काळात सोशियल डिस्टेन्स चे पालन करत रक्तदान शिबिराचे आयोजन करून देशात असलेली क्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारी रक्तपेढ्यांना संपूर्ण सहकार्य करावे या सूचना जिल्ह्यातील मंडळांना देण्यात येणार आहेत. या सर्व सुचना या ह्या वर्षासाठी मर्यादित आहेत, पुढील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास यांमधे बदल केले जावू शकतात. महत्वाचे म्हणजे ही नियमावली नाही तर मंडळांसाठी पाळावयाची सूचनावली आहे असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले. शासन स्तरावर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन नियमावली जाहीर करावी अशीही मागणी समितीने केली आहे.

टॅग्स :thaneठाणेGanpati Festivalगणेशोत्सवcultureसांस्कृतिक