शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील बापगांव - देवरुंगचा ग्रा.पं.गांव कारभार पती,पत्नीच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:03 IST

Sarpanch Election : भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निडणूका नुकत्याच पार पडल्या होत्या. या ग्रामपंचायतींवर सरपंच ,उपसरपंच निवडीचा प्रशासकीय कारभार तात्काळ लागू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन टप्यात कार्यक्रम हाती घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे.

- नितिन पंडीतभिवंडी  - तालुक्यातील ५६ ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निडणूका नुकत्याच पार पडल्या होत्या. या ग्रामपंचायतींवर सरपंच ,उपसरपंच निवडीचा प्रशासकीय कारभार तात्काळ लागू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन टप्यात कार्यक्रम हाती घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे.यामध्ये तालुक्यातील बापगांव - देवरुंग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पत्नी भारती बाळाराम गोडे तर उपसरपंचपदी पती बाळाराम दिनकर गोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रुपग्रामपंचायतीचा गावकारभार नवरा बायकोच्या हाती सोपवण्यात आल्याने तालुक्यात चर्चेला एकच उधाण आले आहे.बापगांव - देवरुंग ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ असून बुधवारी झालेल्या सरपंच ,उपसरपंच पदाच्या निवडणूकिसाठी भारती गोडे ,बाळाराम गोडे ,राजू गोडे ,फरीना जावरे, गंगुबाई वाघे , किशोर गायकवाड, प्रसाद केणे, वैशाली गोडे, सुजाता केणे आदी सर्व सदस्य उपस्थित होते. या निवडणूकिसाठी पीठासीन अधिकारी म्हणून संदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती.ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत सरपंच पदासाठी भारती गोडे तर उपसरपंचपदासाठी बाळाराम गोडे या पती- पत्नीचे एकमेव उमेदवारी नामांकन दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच पीठासीन अधिकारी संदीप परदेशी यांनी सरपंच भारती गोडे तर उपसरपंच म्हणून बाळाराम गोडे यांची नियुक्ती जाहीर केली.सरपंच,उपसरपंच पदाची नियुक्ती जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळत एकच जल्लोष केला. यावेळी माजी आमदार रूपेश म्हात्रे, पिसे सरपंच विजय पाटील, माजी सरपंच मंगलदास पाटील ,समाजसेवक गणेश मेहर ,मनोहर तरे ,ग्रामसेवक अनिल कांदणे आदींनी नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंचांचे पुष्पमाळा अर्पण करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :bhiwandiभिवंडी