शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आमदाराच्याविरोधात शहरात बॅनरबाजी; रस्त्याच्या कामावरून स्थानिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 23:29 IST

अंबरनाथमध्ये बालाजी किणीकर यांच्याविरोधात केली बॅनरबाजी; पाहणी दौरा केला रद्द

अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम संथगतीने चालल्याचा आरोप करत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात शुक्रवारी बॅनरबाजी करण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून हे काम अतिशय संथ सुरू असून याला आमदारांचा निष्क्रिय कारभार कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे अंबरनाथमधील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या कल्याण- बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण एमएमआरडीएकडून केले जात आहे. सध्या रेशनिंग ऑफिस ते मोरिवलीनाक्यापर्यंतच्या पट्ट्यात हे काम सुरू आहे. मात्र, हे काम अतिशय कासवगतीने सुरू असून यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मेटलनगर भागातील रिक्षाचालक लल्लन यादव हे जखमी झाले. यादव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यामुळे त्यांच्यावर सध्या घरी बसण्याची वेळ आली आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार डॉ. किणीकर हे अधिकाऱ्यांसह रस्त्याची पाहणी करणार होते. मात्र, त्यापूर्वीच स्थानिकांनी ठिकठिकाणी आमदारांच्या निषेधाचे बॅनर लावत त्यांना काळे झेंडे दाखवायची तयारी केली. आमदारांच्या दौऱ्याची वेळ होताच आमदारांविरोधात घोषणाबाजीही सुरू झाली. काँग्रेस आणि स्वाभिमान संघटनेनेही स्थानिकांना पाठिंबा दिला.

या सगळ्याची माहिती मिळताच किणीकर यांनी रस्त्याचा पाहणी दौरा ऐनवेळी रद्द केला. तसेच एमएमआरडीए, अंबरनाथ नगरपालिका, महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक सरकारी विश्रामगृहात बोलावली. बैठक सुरू असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर हे कुणालाही न कळवता अचानक तिथे दाखल झाल्याने अनेकांना घाम फुटला. यानंतर अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत सर्व अडथळे पूर्ण करत कामाला गती देण्याचे आश्वासन आमदार किणीकर आणि शहरप्रमुख वाळेकर यांना दिले.दिरंगाई झाल्याचे केले मान्य आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना बॅनरबाजीबाबत विचारले असता रस्त्याला दिरंगाई झाल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना