शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात धावत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग करणा-यास अटक: चितळसर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 17:04 IST

वर्षभरापूर्वी तीन हात नाका येथून बसलेल्या तरुणीचा एका रिक्षा चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. आता सहप्रवाशानेही धावत्या रिक्षात विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देधावत्या रिक्षातील घटनेने ठाण्यात खळबळप्रकार अनावधानाने घडल्याचा आरोपीचा दावाकाही महिलांनीही घेतली आरोपीची बाजू

ठाणे : धावत्या रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसलेल्या बँक कर्मचारी तरुणीचा विनयभंग करणा-या विलास विशे (२९, रा. शहापूर, जिल्हा ठाणे) याला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.हे दोघेह ६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक येथून शेअर रिक्षामध्ये बसले होते. वसंतविहार येथील पोस्ट कार्यालयात तर ती त्याच परिसरातील एका बँकेत नोकरीला आहे. रिक्षा माजीवडा येथून टर्न घेऊन वसंतविहारकडे जात असतांना त्याने तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर वसंतविहार येथे आल्यावर काही नागरिकांनी पकडून त्याला चितळसर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तात्काळ अटक केल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, आपल्याकडून हा प्रकार अनावधानाने झाल्याचा दावा या पोस्ट कर्मचा-याने केला. तसेच हा कर्मचारी चांगल्या चारित्र्याचा असल्याचा दावाही काही महिलांनी करीत त्याला सोडण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र, कायदेशीर करुन हा अधिकारी न्यायालयाचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले........................धावतया रिक्षातील हा तिसरा प्रकारधावत्या रिक्षामध्ये दोन वर्षापूर्वी स्वप्नाली लाड या तरुणीसोबत रिक्षा चालकानी अश्लील चाळे करण्याचा प्रकार केला होता. त्यावेळी तिने धावत्या रिक्षातून उडी घेऊन या प्रकाराला विरोध केला होता. त्यानंतर वर्षभरापूर्वीही ज्ञानेश्वरनगर येथील एका रिक्षा चालकाने तीन हात नाका येथून बसलेल्या एका तरुणीचा विनयभंग केला होता. नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर मात्र चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे त्याने मान्य केले होते. या पार्श्वभूमीवरच या तरुणीनेही तात्काळ आरडाओरडा करुन या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेcommunityसमाज