शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे एटीएम डोंबिवलीत असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:46 IST

वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. याबाबत बँकांनी काळजी घ्यावी, सुरक्षारक्षक नेमावे, अशी सूचना त्यांना दिली जाणार असून त्यासाठी मंगळवारी बँक अधिकाºयांची बैठक होणार आहे.जानेवारीत विविध बँकांमधील ग्राहकांचे पैसे रातोरात दिल्लीतील व्यक्तीने वळते करून घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर रामनगर पोलिसांनी पार हरियाणापर्यंत जाऊन त्याचा मागोवा घेतला. त्यात बँकांचे एटीएम असुरक्षित असून तेथूनच ग्राहकांचा डेटा चोरीस जात असल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या हाती आला आहे.बँकांच्या एटीएममध्ये विशिष्ट पद्धतीने लावलेल्या डिव्हाईसमध्ये ग्राहकांच्या खात्यांसह अन्य माहिती गोळा केली जाते. त्या आधारे दिल्ली, हरियाणा अशा विविध ठिकाणांहून पैसे वळते केले जात असल्याने तपासकामात अडथळे येतात. तसे पुन्हा घडू नये, सध्या होणाºया घटनांना आळा बसावा, यासाठी ठिकठिकाणच्या बँकांनी एटीएममध्ये सशक्त, सुशिक्षित सुरक्षारक्षक तैनात करावे, असे आवाहन पोलिसांनी केले असून रामनगर पोलीस ठाण्यात होणाºया बँक अधिकाºयांच्या बैठकीत तसे सुचवले जाण्याची शक्यता आहे. एटीएमच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटींवर त्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.एटीएममध्ये येणाºया व्यक्ती अनेकदा चेहरा झाकतात. रुमाल बांधतात. टोपी-मास्क-हेल्मेट घालतात. त्यामुळे सुरक्षेसाठी कॅमेरे असले तरी चेहरा दिसत नाही. तपासात अडथळा येतो. त्यामुळे अशा व्यक्तींना सुरक्षारक्षकांनी हटकायला हवे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला हवे, यासारखे मुद्देही यावेळी समोर येण्याची शक्यता आहे.>‘२५ ग्राहकांना फटका’२० जानेवारीला डोंबिवलीतील सात व्यक्तींनी पैसे वळते झाल्याची तक्रार रामनगर आणि टिळकनर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतरच्या तपासात सुमारे २५ ग्राहकांना फटका बसल्याचे दिसून आले.त्यामुळे बँकांची तातडीची बैैठक घेत असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :atmएटीएमdombivaliडोंबिवली