शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बंदीवरून दोन यंत्रणांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:57 IST

केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

- प्रशांत माने कल्याण : केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मध्यंतरी प्लास्टिक संकलनाची संयुक्त कार्यवाही सुरू करण्यात आली होती. सद्य:स्थितीला ही मोहीम पूर्णपणे बंद पडली आहे. केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असून या मंडळाने नाकर्तेपणाबाबत महापालिकेला नोटीस बजावली आहे. या मुद्यावर दोन्ही यंत्रणांमध्ये जुंपली असून महापालिकेकडून कार्यवाही होत नसल्याने केडीएमसीच्या हद्दीत प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचा आरोप मंडळाने केला आहे.२३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीने स्थानिक पातळीवर प्रारंभी नऊ ठिकाणी प्लास्टिक केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले; परंतु प्रत्यक्षात चारच ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली. यात कल्याणमधील आधारवाडी आणि सुभाष मैदान, पूर्वेकडील ड प्रभाग कार्यालय आणि डोंबिवलीतील सूतिकागृहाचा परिसर यांचा समावेश होता. सद्य:स्थितीला केवळ आधारवाडी येथीलच संकलन केंद्र सुरू आहे. महापालिकेने काही प्रभागांमध्ये कचरा गोळा करण्याचे कंत्राट दिले असून त्यांच्या माध्यमातूनच ओला आणि सुका कचऱ्यासह प्लास्टिक संकलन केले जाणार आहे. एकीकडे ठोस कृतीअभावी प्लास्टिकबंदीचा बोºया वाजल्याचे चित्र सर्वत्र दिसत असताना केडीएमसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन करण्याच्या विशेष मोहिमेलादेखील एक प्रकारे खोडा बसला आहे. केडीएमसीकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे. संबंधित विभागाची कारवाई औद्योगिक क्षेत्रात सुरू असताना महापालिका क्षेत्रातील प्रभागस्तरावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने केडीएमसीकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी दिली. दोन महिन्यांपूर्वीच प्लास्टिकबंदी मोहिमेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महापालिकेला शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. त्याबाबतही कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नसल्याकडे दुर्गुळे यांनी लक्ष वेधले. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, सहायक आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य निरीक्षक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचेही दुर्गुळे यांचे म्हणणे आहे. आमच्या विभागाकडून कारवाई सुरू आहे, पण केडीएमसीच्या नाकर्तेपणामुळे कल्याण-डोंबिवली शहरांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याचा आरोप दुर्गुळे यांनी केला. याप्रकरणी केडीएमसीला दोनच दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.>नोटीसबाबत माहिती नाहीप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसबाबत मला काहीही माहीत नाही. केडीएमसीची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर यापूर्वी आम्ही संयुक्त कार्यवाही केलेली आहे. यापुढेही आमची सहकार्याचीच भूमिका राहील, असे केडीएमसीचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.