शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा पिकवणार आता कडधान्य, भाजीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:34 IST

आलेल्या संकटाला रडून नाही तर लढून परतवण्यावर भर देण्याचा संकल्प बळीराजाबरोबरच कृषी विभागाने केला आहे.

बदलापूर : अतिवृष्टीचे संकट वरचेवर येत आहे. त्यातून बाहेर येत नाही तर यंदा कोरोनाचे संकट उभे राहिले. सर्वच व्यवहार ठप्प होताना बळीराजा मात्र संकटाचे संधीत रूपांतर करण्याच्या मन:स्थितीत आहे. यासाठी राज्याचा कृषी विभागही सक्रीय झाला आहे. त्यामुळे यंदा बळीराजा भाताबरोबरच कडधान्य आणि भाजीचे पीक घेण्यासाठी तयारीला लागला आहे. आलेल्या संकटाला रडून नाही तर लढून परतवण्यावर भर देण्याचा संकल्प बळीराजाबरोबरच कृषी विभागाने केला आहे.गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही तूट भरून काढण्यासाठी कोरोनाच्या संकटातही कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील बहुतेक शेतकरी हे कृतीशील व नवनवीन प्रयोग करणारे आहेत. त्यांना राज्याच्या कृषी विभागाचेही पाठबळ मिळत आहे. आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली. यात या विषयवार चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. भातशेतीच्या बांधावर तुरीचे पीक घेण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे.शेताच्या बांधावर गवत मोठया प्रमाणात उगवते. या गवतामुळे फायदा होत नाही तर उलट नुकसानच होते. या गवताच्या जागी जर तुरीबरोबरच लाल डांगराचा लागवडीचा प्रयत्न केला तर भाताबरोबर कडधान्य आणि भाजी असे पीक घेता येईल. यंदा पहिल्यांदाच कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात हा प्रयोग करण्याचा विचार कृषी विभागाने केला आहे.शेताच्या बाजूला अनेक ठिकाणी ओसाड पडीक जमीन उपलब्ध आहे. अशा ओसाड जमिनीवर बांबू लागवडीसाठीही चाचपणी सुरू असून त्यासाठी काही भागांची नावे पुढे आली आहेत.>बांबू लागवडीसाठी पोषक जमीनअंबरनाथ तालुक्यात कारंद, येवे, बोराडपाडा अशा भागांत बांबू लागवडीसाठी पोषक जमीन असल्याची माहिती अंबरनाथ पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर.एच. पाटील यांनी दिली. कृषी विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे अंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुक्यांत भाताबरोबरच तूरडाळ, लाल डांगर, बांबू अशा पिकांमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देण्याचा प्रयत्न सुरू आहे.