शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बालनाट्य महोत्सवाचाही ठाण्यात फ्लॉप शो, महापौरांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 03:01 IST

पंडित राम मराठे संगीत महोत्सवाला प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याची घटना ताजी असतानाच सोमवारपासून सुरू झालेल्या बालनाट्य महोत्सवाचीसुद्धा तीच अवस्था झाल्याचे बघावयास मिळाले.

ठाणे : पंडित राम मराठे संगीत महोत्सवाला प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याची घटना ताजी असतानाच सोमवारपासून सुरू झालेल्या बालनाट्य महोत्सवाचीसुद्धा तीच अवस्था झाल्याचे बघावयास मिळाले. पहिल्याच दिवशी अवघे २५ ते ३० प्रेक्षक या महोत्सवाला लाभले. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह क्रीडा, सांस्कृतिक सभापतींनीही पाठ फिरवली. परिणामी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या समारोहाचा शुभारंभ झाला. परंतु, प्रेक्षकांची संख्या पाहून त्यांनीही खंत व्यक्त केली.मागील आठवड्यात गडकरी रंगायतन येथे पंडित राम मराठे संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकाही प्रेक्षकाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे ठाणेकरांची रसिकता कमी झाली का, असा सवाल उपस्थित झाला होता. आता सोमवारपासून बालनाट्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पूर्वी हा महोत्सव चार ते पाच दिवस रंगत होता. यंदा मात्र दोनच दिवस आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी सहा, तर सोमवारी चार बालनाट्ये सादर झाली. शुभारंभाच्या वेळेस प्रेक्षकांची संख्या २५ ते ३० च्या आसपासच दिसून आली. त्यामुळे महापालिकेचे क्रीडा आणि सांस्कृतिक सभापती दीपक वेतकरांनीही दांडी मारली. त्यामुळे या महोत्सवाचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते करण्यात आला. परंतु, त्यांनीदेखील प्रेक्षकांची संख्या पाहून खंत व्यक्त केली. परंतु, तो साजरा करायचा असल्याने त्यांनी नाइलाजास्तव शुभेच्छाही देऊन येथून काढता पाय घेतला.मागील काही वर्षे या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत होता. प्रत्येक प्रभागातील नगरसेवक या महोत्सवाचे पास मागून घेत होते. परंतु, यंदा मात्र नगरसेवकांनीही निरुत्साह दाखवल्याने त्याचा फटका या महोत्सवाला बसला. कोपरीतील एक नगरसेवक जे प्रत्येक वर्षी २०० ते २५० मुले या महोत्सवाला घेऊन येत होते, ते आता नगरसेवक नसल्याने त्यांनी यातून काढता पाय घेतला. त्यात महापालिकेच्या बिघडलेल्या नियोजनामुळेसुद्धा त्याचाही फटका बसल्याचे दिसून आले. त्यात यंदापासून क्रीडा विभागामार्फत या महोत्सवाचे आयोजन केल्यानेत्यांना या महोत्सवाबाबत जनजागृती करता आली नसल्याचे यातून स्पष्ट झाले.कार्यक्र माच्या निमंत्रणपत्रिकेमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर मीनाक्षी शिंदे, राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, खासदार, आमदार आणि सर्व विशेष समिती सभापतींची नावे टाकली आहेत. मात्र, महापौरवगळता एकाही मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावली नाही. यंदाच्या महोत्सवाला सात ते आठ लाखांचा निधी दिला आहे.दोन तास उशिरा सुरू झाला कार्यक्र म : महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ वाजता करण्यात येणार होते. मात्र, ९ चा नियोजित असलेला कार्यक्रम तब्बल ११ ते सव्वाअकराच्या दरम्यान सुरू झाला. ११ च्या दरम्यान महापौरांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. खाजगी शाळांच्या २५ ते ३० मुलांची उपस्थिती होती.

टॅग्स :thaneठाणे