शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पट रकमेचे आमिष, १५ लाखांची फसवणूक; श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:30 IST

६७ वर्षांच्या सुनीता मोरजकर यांना कंपनीचा मालक सागर मास्टर याच्यासह तिघांनी गंडा घातल्याचे उघड झाले.

ठाणे : प्लॅटीनम ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांमध्ये दुप्पट रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ६७ वर्षांच्या सुनीता मोरजकर यांना कंपनीचा मालक सागर मास्टर याच्यासह तिघांनी गंडा घातल्याचे उघड झाले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.

तिरुमलाय ट्रेड व प्लॅटीनम ट्रेडिंग सर्व्हिसेस कंपनीचे मालक सागर मास्टर व त्यांचा सहकारी मंगेश शेलार तसेच त्यांची सहकारी सुरेखा प्रसाद यांनी मोरजकर यांना त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास गळ घातली. गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीच्या रकमेवर २० टक्के रक्कम अशी दहा महिन्यांत दामदुप्पट फायदा होईल, असे आमिष दाखविले. याच आमिषाला बळी पडून मोराजकर यांच्यासह त्यांची मुले, पती आणि ओळखीच्या लोकांनी १५ लाखांची रक्कम ऑक्टोबर २०२२ मध्ये गुंतवली. कंपनीने १५ फेब्रुवारी २०२३ रोजीचे धनादेश त्यांना दिले होते. त्यापैकी काही धनादेश हे  वटले नाहीत. त्यानंतर त्यांनी आणि त्यांचा मुलगा विनय याने २९ मार्च २०२३ रोजी या कंपनीच्या वागळे इस्टेट येथील कार्यालयात चौकशी केली. त्यावेळी फसवणूक उघडकीस आली.

कंपनीचे कार्यालय दोन महिन्यांपासून बंद

या कंपनीचे कार्यालय हे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याची माहिती त्यांना सुरक्षा रक्षकाकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी या टोळक्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापैकी कुणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. अखेर मोरजकर यांनी २९ मार्च रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात सागर मास्टर याच्यासह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीthaneठाणे