शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर पालिका : २९० विषयांना दिली स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:36 IST

कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.

बदलापूर : कुळगाव-बदलापूर पालिकेकडे आर्थिक तरतूद नसतानाही २९५ विषयांची तब्बल ३६ कोटींची कामे घेण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदा विषय घेण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही घेतली. जिल्ह्यातील नेत्यांनी यासंदर्भात नंतर निर्णय घेऊ, असे निर्देश दिल्यावर बुधवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे सर्व आर्थिक विषय स्थगित करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनीच घेतला. त्यांच्या या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही आक्षेप नोंदवला नाही.कुळगाव-बदलापूर पालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात जी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, त्या तरतुदीपेक्षा चार कोटी रुपये अतिरिक्त खर्च करण्यात आले आहे. आधीच अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींपेक्षा जास्त खर्च झालेला असतानाही अर्थसंकल्पाला बाजूला सारून कोट्यवधींची कामे करण्याचा घाट घातला जात आहे. पालिकेने अर्थसंकल्पात ज्याज्या विकासकामांसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे, त्यातील ज्या कामांवर खर्च झालेला नाही, तो खर्च सुधारित अर्थसंकल्पात वर्ग करणे शक्य आहे.मात्र, पालिकेने वर्षभरात प्रचंड प्रमाणात कामे केल्याने यंदाच्या अर्थसंकल्पातून या कामांची बिले देणेही शक्य होणार नाही. अशी स्थिती असताना अर्थसंकल्पाला अधीन राहून नव्याने विकासकामांचा समावेश करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाकडून माहिती न घेताच विषयपत्रिका तयार झाल्याने प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.विषयपत्रिका तयार झाल्यावर आता प्रशासनानेही आपली माहिती तयार केली आहे. यात संबंधित विषयांसाठी पालिकेकडे आर्थिक तरतूद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधीच्या विषयांचीच बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन विषय घेणे शक्य नसल्याचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत काय निर्णय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर, पालिकेच्या विषयपत्रिकेत आलेल्या विकासकामांना निधी नसल्याने त्यासंदर्भात जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी हस्तक्षेप करून स्थानिक नगरसेवकांना सबुरीने घेण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार, सर्वसाधारण सभेत २९५ विषयांपैकी स्वच्छता अभियानाशी निगडित चार विषयवगळता इतर सर्व विषय तहकूब करण्यात आले.नगरसेवक, प्रशासनामध्ये समन्वयाचा अभावकुळगाव-बदलापूर पालिकेत नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव या सर्वसाधारण सभेत स्पष्ट दिसत होता. प्रशासनाने निधी नसल्याची दिलेली माहिती हीच या सर्वसाधारण सभेच्या मुळावर घाव घालणारी ठरली आहे. त्यामुळे आता भविष्यात तहकूब विषयांची सभा पुन्हा घेतल्यावर त्यावर काय निर्णय होणार आणि जिल्ह्यातील नेते काय निर्णय देणार, हे दिवाळीनंतर स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर