शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर नगरपालिकेने पूरग्रस्तांना मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:09 IST

विशेष सभेची मागणी : नागरिकांचे नुकसान

बदलापूर : बदलापूरमध्ये २६ व २७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त नागरिकांना नगरपालिकेकडून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी नगरपालिकेची विशेष सभा बोलवण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

या विशेष सभेत पूरग्रस्त नागरिकांना तातडीची आर्थिक मदत करण्याबरोबरच मालमताकरात सूट देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली. पूरग्रस्त भागात नगर नियोजनात तळ मजला हा स्टील फ्लोअर करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करून सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. तोपर्यंत नकाशा मंजुरी थांबवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. नैसर्गिक नाले बुजवून विकासकांनी भरणा किंवा तत्सम कामे केल्यामुळे त्यावर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागात आवश्यक ती कामे तातडीने करण्याची गरज आहे. एनडीआरए, टीडीआरएफच्या धर्तीवर नगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन यंत्रणा स्थापन करण्यात यावी.बदलापुरातील पुरामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने पूरग्रस्त नागरिकांना २०१९-२० या वर्षासाठी मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कालिदास देशमुख यांनी केली आहे. पुरामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे गरजेचे होते, असे देशमुख यांनी सांगितले.मदतकार्याला गतीच्पुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांच्या घरातील सामानाची नासाडी झाल्याने हे वाया गेलेले सामान फेकण्याची वेळ आली आहे. ते सामान फेकण्यासाठी पालिकेने मोठी यंत्रणा कामासाठी लावली आहे. जेसीबी आणि डंपरचा मोठा ताफ ा या कामात व्यस्त आहे. तर काही सेवाभावी संस्थांनीही यंत्रणेची मदत करत पालिकेच्या कामाला हातभार लावला आहे.च्पालिकेच्या वतीने नियमित औषध फवारणी केली जात आहे. तसेच साथीचे आजार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. सरकारी यंत्रणेपेक्षा स्थानिक राजकीय पुढारी हे चांगल्या पध्दतीने काम करत असल्याचे नागरिक सांगत आहे.

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूर