शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बारमालकाकडून आयुक्तांची बदनामी, वादग्रस्त चित्रफीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:46 IST

महापालिकेची कारवाई जिव्हारी लागल्याने बारमालक अश्विन शेट्टी याने आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदनामीकारक चित्रफीत व्हायरल केल्याचे उघड झाले आहे.

ठाणे : महापालिकेची कारवाई जिव्हारी लागल्याने बारमालक अश्विन शेट्टी याने आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदनामीकारक चित्रफीत व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या तपासामध्ये हा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर संबंधित बारमालकासह मनसेच्या एका कार्यकर्त्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.ठाणे महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्याकडे कामाला असलेल्या एका मुलीची चित्रफीत काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. आयुक्त आपल्याकडून मसाज करून घेतात, असा धक्कादायक दावा या मुलीने चित्रफितीमध्ये केला होता. या मुद्याचा दुरुपयोग करून काहींनी आयुक्तांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी आयुक्तांनी स्वत:च केली. खंडणीविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना खळबळजनक माहिती समोर आली.महापालिकेने मध्यंतरी अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली. त्या वेळी उपवन परिसरातील ‘रेडबुल’ आणि ‘आईना’ बारवर महापालिकेने कारवाई केली होती.चित्रफितीमध्ये आयुक्तांवर आरोप करणाºया मुलीचे घरही या कारवाईमध्ये जमीनदोस्त करण्यात आले होते. महापालिकेची कारवाई जिव्हारी लागल्याने बारमालक अश्विन शेट्टी याने त्या मुलीला गाठले. तिला आयुक्तांवर गंभीर आरोप करण्यास सांगून तिची चित्रफीत तयार केली.पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदनामी करणारी चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आली. ही चित्रफीत व्हायरल करण्यामध्ये मनसे कार्यकर्ते संदीप गोंडुकुबे यांचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे.त्याअनुषंगाने दोघांविरुद्ध चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ५०० आणि ५०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या चित्रफितीमुळे काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरात खळबळ उडाली होती. पालिकेतही हा चर्चेचा विषय ठरला होता.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका