शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
3
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
4
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
5
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
6
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
7
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
8
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
9
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
10
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
11
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
12
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
13
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
14
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
15
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
16
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
17
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
18
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
19
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
20
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड

साहित्य ते ज्योतिषशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात बाबूजींनी ठसा उमटविला- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 20:48 IST

जेष्ठ लेखक बाबूराव मारुतीराव सरनाईक अर्थात बाबूजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानिमित्त त्यांना सर्वपक्षिय नेत्यांनी ठाण्याच्या वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या सभागृहात रविवारी श्रद्धांजली वाहिली.

ठळक मुद्दे सर्वपक्षिय नेत्यांनी वाहिली बाबूराव सरनाईक यांना श्रद्धांजलीलढवय्या व्यक्तिमत्व म्हणून बाबूजींची ओळख उपेंद्र भट यांनी वाहिली संगीतपर श्रद्धांजली

ठाणे: साहित्य, पत्रकारिता ते ज्योतिषशास्त्र अशा सर्व क्षेत्रात कै. बाबुराव अर्थात बाबूजी सरनाईक यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. पत्रकारितेतील सफर, आयुष्यातला संघर्ष आणि आचार्य अत्रेंचे किस्से ऐकावे ते बाबुजींकडूनच अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबूजींना आदरांजली वाहिली.संयुक्त महाराष्ट्र लढयातील नेते, प्रख्यात पत्रकार ‘मराठा’ कार आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साक्षीदार आणि साथीदार पत्रकार, लेखक तसेच आमदार प्रताप सरनाईक यांचे वडील बाबुराव अर्थात ‘बाबूजी’ यांचे ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम रेमंड कंपनीच्या सभागृहात रविवारी आयोजित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबूजींच्या आचार्य अत्रे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, सर्वच क्षेत्रात बाबूजींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता. प्रतिकूल परिस्थितीत त्याग, संघर्ष आणि कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा हाकला. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास तोंडपाठ असलेले बाबूजी हे नव्या पिढीसाठी आणि पत्रकारितेतील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक होते, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक तसेच जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्वातत्र्य लढा ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून अनुभवणारे आणि या लढयाचे साक्षीदार असलेले एक लढवय्या व्यक्तिमत्व म्हणुन बाबुराव सरनाईक यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे आचार्य अत्रेंचा एक साक्षीदार हरपल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच प्राध्यापक, लेखक प्रदीप ढवळ यांनी बाबूजींच्या व्यक्तिगत जीवनातील आठवणींना उजाळा देऊन आपल्याला पुस्तक लिहितांना बाबुजींकडून मिळालेल्या अनुभवाचे कथन केले.यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आमदार सुनील राऊत, रवींद्र फाटक, गणपत गायकवाड, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, नरेंद्र मेहता, जितेंद्र आव्हाड, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, मिरा भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच सर्व स्तरातील मान्यवर, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नगरसेवकांनी उपस्थित राहून बाबूजींना आदरांजली वाहिली. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांचे त्यांनी सांत्वन केले. यादरम्यान भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांनी श्रद्धांजलीपर गीतांचा कार्यक्र म सादर केला.

टॅग्स :thaneठाणेcommunityसमाज