शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या चौपाटीवर ‘बाबा’ घोड्याचा बुडून मृत्यू, दोर पायात अडकल्याने दुर्घटना घडल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:15 IST

राबोडीतील शेख आणि गांधीनगरमधील फुलचंद जैस्वार तसेच अन्य एक जण असे तिघे जण आपापले घोडे धुण्याबरोबर त्यांना पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास तलावपाळीच्या दत्त गणेश विसर्जन घाटावर घेऊन आले होते.

ठाणे : मनाई असतानाही अंघोळीसाठी नेलेल्या तीन घोड्यांपैकी एका १६ वर्षीय घोड्याचा ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ‘बाबा’ असे या मृत घोड्याचे नाव आहे. राबोडीतील युसूफ शेख यांनी मंगळवारीच हा घोडा कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून कुटूंबाचे दागिने विकून खरेदी केला होता.अशाप्रकारे तलावात घोड्याचा बुडून मृत्यू होण्याची ठाण्यातील ही पहिलीच घटना असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राबोडीतील शेख आणि गांधीनगरमधील फुलचंद जैस्वार तसेच अन्य एक जण असे तिघे जण आपापले घोडे धुण्याबरोबर त्यांना पोहण्यासाठी दुपारच्या सुमारास तलावपाळीच्या दत्त गणेश विसर्जन घाटावर घेऊन आले होते. तिन्ही घोड्यांना पाण्यात उतरविल्यानंतर बाबा या घोड्याला बांधलेला दोर सुटून त्याच्या पायात अडकल्याने तो पाण्यात बुडू लागला. बाबा बुडताना पाहून इतर दोन्ही घोड्यांना बाहेर काढून त्याला वाचविण्यासाठी मालकासह १५ ते १६ जणांना धाव घेतली. बाबाला कसेबसे काही मिनीटात घाटाच्या पायरीवर पाण्यातून ओढून काढले.मात्र,तोपर्यंत त्याच्या नाकातोंडात पाणी गेले होते. पायºयांवर आणल्यावर तो जिवंत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पण,नाकातोंडात पाणी गेल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी बाबाचे शव भिवंडी येथील प्राण्याच्या रुग्णालयात पाठवले असून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.दागिने विकून घेतला होता घोडाशेख यांनी पत्नीचे मंगळसूत्र आणि मुलांचे दागिने विकून खानदानी घोडागाडीचा व्यवसाय असल्याने त्यासाठी बाबा नामक घोड्याला ५० हजारांना विकत घेतले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.मनाई असतानाही घटनाठाण्याची चौपाटी असलेल्या तलावात घोड्याचा बुडून मृत्यू झाल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अशाप्रकारे मनाई असतानाही ही दुदैवी घटना घडल्याने चौपाटीची सुरक्षा वाºयावर असल्याचे बोलले जात आहे.पूजाअर्चा केली जाणार होतीयुसूफ याचे वडील हे पूर्वी ठाण्यात घोडागाडी चालवत होते.त्यानंतर त्याचे भावंडेही हाच व्यवसाय करीत असल्याने त्यांनीही तलावपाळी येथे घोडागाडीसाठी घोडा खरेदी केला.त्याला बुधवारी दुपारी धुवून संध्याकाळी त्याची पुजाअर्चा करून व्यवसाय सुरूकरणार होते, अशी माहितीफुलचंद जैस्वार यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे