शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बाबांनो, महासभा सुरळीत होऊ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:44 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेची महासभा भाजपा सत्ताधा-यांच्या काळात गोंधळीच ठरू लागल्याने ८ डिसेंबरपासूनच्या पुढील महासभा व्यवस्थित होऊ द्या, असे म्हणण्याची वेळ सत्ताधारी भाजपावर आल्याने विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेची महासभा भाजपा सत्ताधा-यांच्या काळात गोंधळीच ठरू लागल्याने ८ डिसेंबरपासूनच्या पुढील महासभा व्यवस्थित होऊ द्या, असे म्हणण्याची वेळ सत्ताधारी भाजपावर आल्याने विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. आ. नरेंद्र मेहता व महापौर डिम्पल मेहता यांनी बुधवारी सर्व गटनेत्यांची बैठक बोलवली असता त्यात विरोधकांना विनवणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.भाजपाने सेनेच्या हक्काच्या विरोधी पक्षनेतेपदावर गदा आणून ते अद्याप लटकत ठेवले आहे. त्यामुळे १६ सप्टेंबरपासूनच्या महाभसेत सेनेने गोंधळ घालून भाजपाच्या सुडाच्या राजकारणाला विरोध दर्शवला. त्यातच, ८ डिसेंबरच्या महासभेत महापौरांनी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या एकमेव नाट्यगृहाची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी आणला आहे. त्यामुळे सेना आक्रमक झाल्याने त्याची तक्रार आ. प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे ही महासभा वादळी ठरणार असल्याचे संकेत मिळाल्याने मेहता व महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवली होती. त्यात शुक्रवारची महासभा शांततेत चालवण्याची विनंती विरोधकांना केल्याचे सांगण्यात आले. नाट्यगृहाच्या मुद्यावर बोलताना महापौरांनी, अनेक वर्षांपासून डी.बी. रिअ‍ॅलिटी या विकासकाने नाट्यगृहाचे बांधकाम सुरू केलेले नाही. यंदा त्याने डिसेंबर २०१८ पर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली असून या मुदतीतही काम पूर्ण होणे शक्य आहे. त्यामुळेच त्याची बांधकाम परवानगी रद्द करून तो भूखंड पालिकेच्या ताब्यात घेण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत आणल्याचा दावा केला. तरीही, विकासक निश्चित मुदतीत नाट्यगृह बांधणार असल्यास विकासकाने त्याची निश्चित मुदत आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे करार स्वरूपात द्यावी. तसेच या बांधकाम खर्चाची बँक गॅरंटीही विकासकाकडून घेतली जावी, जेणेकरून मुदतीत नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण न झाल्यास तो भूखंड पालिका ताब्यात घेऊन त्यावर बँक गॅरंटीच्या पैशांतून नाट्यगृह बांधेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. त्याला सेना, काँग्रेस गटनेत्यांनी सहमती दर्शवली. आता महासभेत काय होते, याकडे साºयांचे लक्ष आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर