शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

भूकंपामुळे रात्र काढली जागून, काही कुटुंबांचा नातेवाइकांकडे आश्रय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 08:52 IST

प्रशासनाने उभारला तंबू : काही कुटुंबांनी घेतला नातेवाइकांकडे आश्रय

लाेकमत न्यूज नेटवर्कशेणवा : शहापूर तालुक्यातील वेहळोली खुर्द गावाला दहा दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची वारंवारता वाढत आहे. शुक्रवारी पहाटेपर्यंत सहा धक्के नागरिकांनी अनुभवले. भूकंपाच्या भीतीमुळे रात्र जागून काढणाऱ्या वेहळोलीकरांसाठी प्रशासनाने तात्पुरत्या तंबूची व्यवस्था केली आहे. 

धास्तावलेल्या वेहळोतीलील काही कुटुंबांनी घरे सोडून नातेवाइकांकडे आसरा घेतला आहे. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुक्रवारी वेहळोलीला भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला. सोगावजवळ काळू नदीपात्रात (डोंगरी वस्तीशेजारी) भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती मिळाल्यापासून किन्हवली, सोगाव परिसरात नागरिकांत भूकंपाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी, शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी वेहळोलीतील नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांनी सायंकाळी ५.०४ वाजता स्वतः भूकंपाचा धक्का अनुभवला. त्यानंतर त्यांनी चिखलगाव, मोहिपाडा, कातकरी वस्त्या, बर्डेपाडा, शिरवंजे, खरिवली, कानडी, शिवाजीनगर या गावांना भेटी दिल्या.

पाणीसाठा कमी करण्याच्या सूचनाआमदार दौलत दरोडा यांनीही वेहळोली ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वेहळोली लघुपाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या सूचना लघु पाटबंधारे प्रशासनाला दिल्या. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, कृषी सभापती संजय निमसे, मारुती धिर्डे यांनीही वेहळोली ग्रामस्थांना धीर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

तलाठी, ग्रामसेवक शहापूरमध्ये ठाण मांडूनग्रामसेवक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. दिवसभरात ५ ते ६ धक्के बसत असल्याने नागरिक दहशतीखाली रात्र जागून काढत आहेत. बर्डेपाडा, खरिवली, नांदगाव, सावरोली, बेलकडी येथे गुरुवारी व शुक्रवारी धक्के जाणवले. वेहळोलीतील काही कुटुंबे राहते घर सोडून नातेवाइकांकडे स्थलांतरित झाली असल्याची माहिती ग्रामस्थ सुनील निमसे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेEarthquakeभूकंप