- सुरेश लोखंडे ठाणे - जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांसाठी ४७९ मतदान केंद्रांवर गावपाड्यांतील दोन लाख ५० हजार ५०० मतदारांना मतदान केंद्रांवर सेवा देणारे दोन हजार ९०० अधिकारी आणि तीन हजार पोलीस कर्मचारी अद्यापही मानधन मोबदल्यापासून वंचित असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात गावपाडे, खेड्यांचा विकास साधणाऱ्या भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणारे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या मानधनाच्या रकमेपासून वंचित आहेत. यामध्ये ग्रामीण परिक्षेत्रात पाच उपअधीक्षकांसह दीड हजार पोलीस कर्मचारी तैनात केले होते. जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या ग्रामपंचायतींच्या ५१सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. पण उमेदवारीअभावी पाच ग्रामपंचायतींत ही निवडप्रक्रिया पार पडली नाही. सहा जणांच्या पथकावर एका केंद्राची जबाबदारीग्रामपंचायतींच्या मतदानासाठी निश्चित केलेल्या ४७९ मतदान केंद्रांवर तब्बल दोन हजार ९०० अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये एक जनसंपर्क अधिकारी, तीन मतदान केंद्र अधिकारी, शिपाई आणि सुरक्षेसाठी पोलीस, आदी सहा जणांच्या पथकाने एका मतदान केंद्राची जबाबदारी पार पाडलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला निवडणूक प्रक्रियेसाठी २१ हजार रुपयांचा निधी दिला आहे. निवडणुकीआधी आठ हजार रुपयांप्रमाणे आणि त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीला १३ हजारांचा निधी वाटप केला आहे. याच निधीतून मानधनाची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणे शक्यच झाले नाही. याआधी झालेल्या निवडणुकांचा निधी व मानधन वेळच्या वेळी वाटप झाले. आहे. - राजाराम तवटे, तहसीलदार, ठाणे
ग्रामपंचायतींचे निवडणूक कर्मचारी मानधनाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:27 IST