शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

७११ मध्ये दवाखाना सुरू करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 03:28 IST

भार्इंदर पालिका : प्रदीप जंगम यांचे बेमुदत उपोषण

मीरा रोड : दवाखाना व प्रसूतिगृहाच्या आरक्षणात बांधलेल्या आमदार नरेंद्र मेहता व संबंधितांच्या ७११ रुग्णालयप्रकरणी पालिकेने जागा ताब्यात घेऊनही तेथे दवाखाना सुरू न केल्याच्या निषेधार्थ जिद्दी मराठा संस्थेचे प्रदीप जंगम यांनी रविवारपासून पालिका मुख्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू केले आहे. संबंधितांवर कारवाई करून ७११ कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासह आयुक्त व प्रशासनाविरोधात आता माघार घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

२०११ मध्ये परवानगी घेऊन ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीने दवाखाना व प्रसूतिगृहाच्या आरक्षणात २०१३ पासून स्वत:चे रुग्णालय सुरू केले. पण, महापालिकेला चार हजार ६६० चौरस फुटांचा दोन मजली दवाखाना व प्रसूतिगृहाचे बांधकाम विनामूल्य बांधून दिले नाही.उलट, मेहता यांनी स्वत: २०१६ मध्ये पालिकेला पत्र देऊन बांधकाम पालिकेस हस्तांतरण करण्यात सूट द्यावी, अशी मागणी केली.७११ रुग्णालय सुरू असताना नागरिकांना पालिकेच्या प्रसूतिगृह व दवाखान्याची सुविधा मात्र मिळत नसल्याने जिद्दी मराठा प्रतिष्ठानचे प्रदीप जंगम यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असता जुलै २०१७ मध्ये पालिकेने तीन महिन्यांत इमारत ताब्यात घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण, ताब्यात घेणे तर सोडाच, उलट आॅगस्ट २०१८ च्या पालिका निवडणुकीत भाजपाचे व नंतर महापौर डिम्पल मेहता यांचे पक्ष कार्यालय उघडण्यात आले.

जंगम यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असता आयुक्तांनाच हजर राहण्याचा आदेश दिला. त्यानंतर, पालिकेला देय असलेला बांधकाम करारनामा करून पालिकेस हस्तांतरित करण्यात आले. विनाभोगवटा रुग्णालय चालवण्यासह करआकारणी न केल्याने पालिकेने त्याचे सुमारे २४ लाख रुपये कंपनीकडून वसूल केले.त्या अनुषंगाने आॅगस्ट २०१८ मध्ये लोकायुक्तांनी तक्रार निकालात काढली. पण, त्यालाही पाच महिने झाले, तरी पालिकेने दवाखाना व प्रसूतिगृह सुरूच केलेले नाही. जंगम, कृष्णा गुप्ता उपोषणात सहभागी झाले आहेत. प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.प्रशासनाची धावपळजंगम यांनी आंदोलन सुरू केल्याने पालिका प्रशासनाची पुन्हा धावपळ सुरू झाली असून नगररचना विभागाचे सहायक संचालक श्रीकांत देशमुख यांनी लेखी पत्र देऊन उपोषणास बसू नये, म्हणून कळवले आहे. पत्रात देशमुख यांनी दिशाभूल करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. जंगम यांनी मेहता, महापौर डिम्पल, आयुक्त खतगावकर यांच्यावर संगनमताचा आरोप करत नागरिकांसाठी दवाखाना व प्रसूतिगृह सुरू करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जंगम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका