शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

बाहुबली, हॉर्स सन मखरांचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:26 IST

दिव्यांग आदिवासी मुलांची कला; १०० विविध प्रकारांत उपलब्ध

ठाणे : गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत आहेत. यंदा कोरोनाचे सावट असले, तरी योग्य ती काळजी घेत गणेशभक्त तयारीला लागले आहेत. मूर्तींबरोबर सजावटीसाठी लागणारे आकर्षक मखरही ठाण्यात उपलब्ध आहेत. यंदा गणेशभक्तांसाठी हॉर्स सन आणि बाहुबली मखर नव्याने आले आहेत. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून हॉर्स सन या मखराला ठाणेकर भक्तांची अधिक पसंती आहे. विशेष म्हणजे पुण्यातील दिव्यांग आदिवासी मुलांनी बनविलेले मखर यंदाचे आकर्षण ठरत आहेत.अवघ्या दोन आठवड्यांवर गणेशोत्सव आला आहे. कोरोनाच्या सावटाखाली साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा निश्चय ठाणेकरांनी केला आहे. मूर्तिकार यंदा मर्यादित मूर्ती घडवित आहेत. उत्सवाचे आकर्षण वाढविणारे मखर यंदा बाजारात आले आहेत. ठाण्यात ओम गणेश आर्टतर्फे मखर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न म्हणून क्रिएटिव्ह पीपल्स संस्थेच्या आदिवासी व वंचित दिव्यांग मुलांनी बनवलेले आकर्षक मखर यात आहे. ठाण्यातील गणेशभक्तांनी या मुलांचे कौतुक म्हणून त्यांनी बनविलेल्या मखरांनादेखील पसंती दिली आहे. वास्तुशास्त्रात सात घोड्यांना महत्त्व असते म्हणून सात घोडे आणि सूर्यमुख दाखविणारे मखर ठाणेकरांच्या पसंतीस पडल्याने सर्वाधिक मागणी या मखराला असल्याचे आयोजक प्रीतेश तावडे यांनी सांगितले. तसेच, लाकडापासून हे मखर बनविले असल्याने चार ते पाच वर्षे टिकते, या हेतूनेदेखील या मखराला पसंती मिळत आहे. ६२०० रुपये ते १२ हजार रुपयांपर्यंत या मखराची किंमत आहे.इको-फ्रेण्डली मखरांना पसंतीकागदापासून बनविलेले बाहुबली मखरदेखील यंदा आकर्षण ठरत आहे. त्याचप्रमाणे मोरेश्वर, वरद विनायक, कुटीर, कापडी मखर, कागदामध्ये मेघडंबरी, सुवर्णासन, देवघर, पितांबर, गोवर्धन, चटईमध्ये कमळ, गणेशरथ, राजगादी, गजानन आसन, मोरपंख, सूर्यमुखी, राजमहल, महल, गणेशमहल, साई आसन, हवा महल, वनराई, मोरपिसारा यासारखे १०० हून अधिक प्रकार पाहायला मिळत आहे. हे इको-फ्रेण्डली मखर कापड, चटई, बांबू, कागद, लाकूड यापासून बनविले आहे. आदिवासी दिव्यांग मुलांचे मोर, मोरपिसारा, कमळ, मोरपंख हे मखरदेखील आहेत. ही सर्व मखरे १० इंच ते चार फुटांपर्यंत बनविण्यात आली आहेत.मखर खरेदीसाठी येणाऱ्याला सोशल डिस्टन्सिंंग पाळा, सॅनिटायझर वापरा, मास्क लावा आदी नियमांचे पोस्टर्स लावले आहेत.- प्रीतेश तावडे, आयोजक