शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील साडेबारा हजार राजपत्रित अधिकाऱ्यांची सर्वसाधारण सभेला उपस्थिती

By सुरेश लोखंडे | Updated: August 16, 2019 19:58 IST

गोरेगाव (पूर्व) येथे १७ ते १८ आॅगस्ट या दोन दिवसाच्या कालावधीत पार पडणार आहे. या सभेसाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडे बारा हजार राजपत्रित अधिकारी उपस्थित राहणार

ठळक मुद्देमहासंघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल.संघटन बांधणी व कल्याण केंद्र उभारणी या विषयावर मार्गदर्शनआयुत स्वाधीन क्षेत्रीय यांचे ‘लोकसेवा हक्कांचे महत्व’ या विषयावर

ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची व्दी वार्षिक सर्वसाधारण सभा आरे कॉलनीतील हॉटेलमध्ये गोरेगाव (पूर्व) येथे १७ ते १८ आॅगस्ट या दोन दिवसाच्या कालावधीत पार पडणार आहे. या सभेसाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडे बारा हजार राजपत्रित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे या राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांचा हवाला देत ठाणे जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस डॉ. अविनाश भागवत यांनी लोकमतला सांगितले.     या व्दिवार्षिक सभेच्या पहिल्या दिवशी या महासंघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. यानंतर कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे संघटन बांधणी व कल्याण केंद्र उभारणी या विषयावर मार्गदर्शन होईल. राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुत स्वाधीन क्षेत्रीय यांचे ‘लोकसेवा हक्कांचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन होईल. व्दि वार्षिक अहवालावरील चर्चेनंतर ‘वस्तू व सेवा कर कायदा’ यावर डॉ. मधूकर गिरी यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय ‘अपहार प्रकरणे कशी हाताळावीत’ या विषयावर रविंद्र धोंगडे यांचे उपस्थित अधिकाºयांना मार्गदर्शन होणार आहे.     या सभेच्या दुस-या दिवशी महिलांचे प्रश्न व त्यावरील उपाय, चर्चाविनिमय व निर्णय या विषयावर डा. सोनाली कदम आपले मत व्यक्त करणार आहे. यानंतर अधिका-यांची आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधूमेह, मुखरोख व दंत तपासणी, ईसीजी केली जाईल. याशिवाय हसत खेळत तणावमुक्ती वर मार्गदर्शन आदी भरगच्च कार्यक्रम या दोन दिवशी सभेत राजपत्रित अधिका-यांसाठी पार पडणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी