शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर गाडी नेण्याचा प्रयत्न; वकिलाच्या मुलास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 22:53 IST

सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य फड (१८) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली.

ठाणे : सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य फड (१८) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. ठाण्याच्या माजी जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांचा तो मुलगा आहे.९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास आदित्य त्याच्या काळी फिल्म असलेल्या कारने मल्हार सिनेमाकडून तीन हात नाक्याच्या दिशेने सिग्नल तोडून येत होता. नाशिक मुंबई वाहिनीवरील सिग्नल तोडल्यानंतर त्याची कार हरिनिवासकडे येणाºया सिग्नलकडे थांबली. त्यावेळी त्याच्याकडे नौपाडा वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी चालक अनुज्ञप्तीची (लायसन्स) मागणी केली. त्याने अरेरावीची भाषा करीत लायसन्स नाही, असते तर दिले असते, आई वकील असल्याने पोलीस काही करु शकत नसल्याचेही त्याने सुनावले. त्यानंतर त्याने कार रेस करुन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कॉन्स्टेबल हारुगले आणि थोरवे यांनी तिथे धाव घेतली. त्याला थांबण्याचा इशारा करुनही त्याने त्यांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्निल भामरे यांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने नितिन कंपनीकडे पलायन केले. त्यावेळी खैरमोडे यांच्या डाव्या हाताच्या एका बोटालाही मार लागला. गाडी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी धर्मवीरनगर सेवा रस्त्यावरुन आदित्यला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad transportरस्ते वाहतूकthaneठाणे