शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीत गुंडाच्या खूनाचा प्रयत्न: दोघा भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 23:25 IST

भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (२५) या गुंडाच्या पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल चेकालिया (२०) याला मंगळवारी तर त्याच्या भावाला बुधवारी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देकोपरी पोलिसांची कामगिरीचाकू आणि लोखंडी सळई हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पूर्ववैमनस्यातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (२५, रा. सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) या गुंडाच्या पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल चेकालिया (२०) याला मंगळवारी तर त्याच्या भावाला बुधवारी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक चॉपर आणि लोखंडी सळई हस्तगत करण्यात आली आहे.कोपरीतील सिद्धार्थनगर भागात २१ सप्टेंबर रोजी दीपकच्या मोठ्या भावाबरोबर विशाल आणि त्याच्या लहान भावाचे भांडण झाले होते. या भांडणामध्ये दीपकने मध्यस्थी केली होती. याच भांडणाचा वचपा काढण्यासाठी २२ सप्टेंबर रोजीपहाटे १ वाजण्याच्या सुमारास दीपक सिद्धार्थनगर येथून जात होता. त्यावेळी त्याचा विशाल आणि विकास या दोन्ही भावांशी वाद झाला. याच वादातून विशालने दीपकच्या पोटात चाकूने वार केले. तर विकासने लोखंडी सळईने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तो अद्यापही बेशुद्ध असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर आणि दत्तात्रय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे आणि जमादार तुकाराम डुंबरे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री विशाल याला अटक केली. त्यापाठोपाठ विकासलाही ताब्यात घेतले असून त्याला भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडी बाल न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडी