शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चेंबूरच्या व्यापा-यास लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 04:18 IST

बँकेतून पाच लाख रुपये काढून भिवंडीकडे जाणा-या चेंबूर येथील एका व्यापा-यास १४ जणांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला. व्यापा-याची जीप पंक्चर करून आरोपींनी घातपात करण्याचा प्रयत्नही केला.

ठाणे : बँकेतून पाच लाख रुपये काढून भिवंडीकडे जाणा-या चेंबूर येथील एका व्यापा-यास १४ जणांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला. व्यापा-याची जीप पंक्चर करून आरोपींनी घातपात करण्याचा प्रयत्नही केला.चेंबूर येथील छेडानगरातील लावण्या सोसायटीचे रहिवासी अशोक चरणदास ठक्कर (४८) यांचा चेंबूर येथेच व्यवसाय असून त्यांनी व्यवसायानिमित्त भिवंडी येथे गोदामही घेतले आहे. माजिवडा येथील युनियन बँक आॅफ इंडियाच्या कापूरबावडी शाखेमध्ये त्यांचे खाते आहे. त्यांचे बहुतांश व्यवहार याच बँकेतून होतात. २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास ठक्कर यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढले. त्यावेळी बँकेत ३० आणि ३५ वर्षीय दोन आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून होते. ठक्कर यांनी हा प्रकार हेरला. संशय आल्याने बँकेतून रोकड घेऊन ते लगेच जीपने भिवंडीकडे निघाले. नाशिक बायपासमार्गे भिवंडीकडे जात असताना मोटारसायकल आणि रिक्षा घेऊन जवळपास १४ आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. या प्रकारामुळे अशोक ठक्कर कमालीचे हादरले.दापोडा रोडवरील एका हॉटेलसमोर टोळीतील एका आरोपीने ठक्कर यांच्या जीपच्या टायरच्या दिशेने एक धारदार शस्त्र फेकले. त्यामुळे जीपचा टायर पंक्चर झाला. मात्र, ठक्कर यांच्या जीपचा टायर ट्युबलेस असल्याने हवा लगेच निघाली नाही. काही अंतरापर्यंत आरोपींनी ठक्कर यांचा पाठलाग केला. ठक्कर कसेबसे भिवंडी येथील त्यांच्या गोदामापर्यंत पोहोचले. या प्रकारामुळे घाबरलेल्या ठक्कर यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास उशीर केला. त्यांची तक्रार आल्यानंतर राबोडी पोलिसांनी शहानिशा करून शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हे अन्वेषण शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. बँकेचे सीसीटीव्ही फुटेज मागवून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी दत्ता सरक यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे