शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक मनोहर डुंबरेंविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

By जितेंद्र कालेकर | Updated: July 18, 2024 22:59 IST

गैरकृत्याला विराेध करीत बाजूला केल्याच्या आकसातून खाेटा गुन्हा दाखल केल्याचा डुंबरेंचा दावा

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घर हडप करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आराेपाखाली भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावले यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

डोंगरीपाडा, किंककाँगनगरातील फुफानी कंपाउंड येथे स्वप्नाली अशोक सोनावले यांचे घर आहे. हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. हे घर मनोहर डुंबरे यांनी दहा लाखांना विकल्याचाही दावा केला. यासंदर्भात भाडेकरूने डुंबरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवर बोलणे करून दिले. जुजबी बोलून डुंबरे यांनी फोन बंद केला. त्यामुळे स्वप्नाली यांनी पुन्हा डुंबरे यांना फोन केला असता, हे घर माझे आहे. तुम्ही कोण आहात? मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे, असे म्हणत डुंबरे यांनी स्वप्नाली यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आराेप आहे. कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली यांनी न्यायालयात १५६ (३) नुसार याचिका दाखल केली. त्यावर ९ जुलै २०२४ रोजी ठाणे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार १६ जुलै राेजी रात्री कासारवडवली पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (अ), ३ (१)(४) आणि ३ (१) (९) नुसार गुन्हा दाखल केला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावले, रमेश समुखराव आणि राजाभाई सूर्यवंशी आदी उपस्थित होते.............आकसातून माझ्यावर खाेटा गुन्हा : मनाेहर डुंबरेअशोक सोनावले हा माझा पूर्वीचा कार्यकर्ता होता. तो माझ्या नावाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकाम करीत होता. माझ्या नावाने उधारीवर पैसे घेत होता. हे सर्व लक्षात आल्यावर त्याला बाजूला केले. याचाच राग धरून त्याने जातीचे कार्ड वापरून माझ्याविरोधात हा गुन्हा दाखल केला.-मनाेहर डुंबरे, माजी नगरसेवक, ठाणे

टॅग्स :BJPभाजपाAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा