शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:01 IST

काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली राबोडीतील एका ३५ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिची पावणेदोन लाखांची फसवणूक करणारा भोंदूबाबा नूर शेख (४९) आणि त्याची पत्नी रुबीना (३३) या दोघांनाही राबोडी पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे : काळी जादू उतरवण्याच्या नावाखाली राबोडीतील एका ३५ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिची पावणेदोन लाखांची फसवणूक करणारा भोंदूबाबा नूर शेख (४९) आणि त्याची पत्नी रुबीना (३३) या दोघांनाही राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.दहीसर पूर्व भागात राहणारी ही महिला तिच्या एका नातेवाइकाच्या ओळखीने ठाण्यातील दुसरी राबोडीतील कोकणी कबरस्तान, कोळीवाडा भागातील नूर शेख या भोंदूबाबाकडे २०१५ मध्ये गेली होती. तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तुमच्यावर काळी जादू झाली आहे. ती उतरवण्यासाठी काही खर्च करावा लागेल, असे सांगून या विवाहितेकडून एक लाख ४८ हजार रुपये त्याने घेतले. तर, तिच्या आईकडून ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर, तुझ्यावर सासू आणि नणंदेने काळी जादू केली असून ती उतरवण्यासाठी नूर बाबा सांगतील तसे कर, असे त्याची पत्नी रुबीना हिने या महिलेला बतावणी केली. त्यानुसार, तो या महिलेवर २०१५ ते नोव्हेंबर २०१८ या तीन वर्षांच्या काळात लैंगिक अत्याचार करत होता. तिने या प्रकाराला नकार दिल्यानंतर रुबीनाने आपल्याच पतीने केलेल्या घृणास्पद प्रकाराचे नकळत व्हिडीओ चित्रण केल्याचे सांगून तिला पुन्हा तसेच करण्यास भाग पाडले.या भोंदूबाबाने आणि त्याच्या पत्नीने अत्याचाराची परिसीमा गाठल्याने अखेर याप्रकरणी या पीडित विवाहितेने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात विनयभंग, बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० नोव्हेंबर रोजी रुबीनाला, तर १ डिसेंबर रोजी नूर शेख याला अटक केली.>हे चित्रण व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडून आणखी ५० हजार रुपये त्यांनी घेतले. तरीही, हा व्हिडीओ व्हायरल करून या महिलेचा पती, मुले आणि आईला ठार मारण्याचीही त्यांनी धमकी दिली.