पंकज राऊत/लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर अणुशक्ती केंद्रापासून ५ ते १६ कि. मी. परिसरातील विकासावर अनेक वर्षा पासून असलेले निर्बंध अखेर हटविण्यात आले असून ०.७५ ऐवजी आता १.०० चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार असल्याने बोईसर तारापूर परिसरातील विकासकांमध्येआनंदाचे वातावरण आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये आलेल्या बांधकाम नियमावलीच्या कायद्यापासून या परिसरातील जमीन मालक व विकासक या निर्बंधांमुळे वंचित राहिले होते पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी याबाबत शासन दरबारी तसेच मुख्यमंत्र्यांकडे विशेष प्रयत्न करून निर्बंध उठविण्यात यश मिळविल्याने आता येथील ठप्प झालेल्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. अणु ऊर्जा केंद्रापासून ५ कि.मी. पर्यंत असलेली बंधने तशीच ठेवून त्यापुढील अंतरासाठी मात्र कोणत्याही बंधनाची आवश्यकता नसल्याचे अणुऊर्जा विभागाने स्पष्ट केल्याने आता किमान सात मजली इमारती बांधण्याची परवानगी प्राप्त होणार आहे.
अणुशक्ती केंद्र : बांधकामावरील निर्बंध हटविले
By admin | Updated: June 2, 2017 04:51 IST