शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अट्टल चोरांची चौकडी ठाण्यात गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:41 IST

सोनसाखळी, वाहनचोरी आणि घरफोड्या करणाºया चार अट्टल चोरांच्या टोळीस ठाण्याच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली. या आरोपींनी केलेले १२ गुन्हे उघडकीस आले

ठाणे : सोनसाखळी, वाहनचोरी आणि घरफोड्या करणाºया चार अट्टल चोरांच्या टोळीस ठाण्याच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने अटक केली. या आरोपींनी केलेले १२ गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याजवळून सुमारे १0 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.भिवंडी येथील पिराणीपाड्यातील यदुल्ला कबरलअली जाफरी (२६) आणि महम्मदअली नादरअली जाफरी (२३) या इराणी आरोपींना मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण आणि त्यांच्या पथकाने ३0 डिसेंबर २0१७ रोजी अटक केली होती. नारपोली पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात ते सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. या चोरीच्या मोटारसायकलचा वापर आरोपींनी सोनसाखळी चोरीसाठी केला. नौपाडा, कासारवडवली, कापूरबावडी, डोंबिवली आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या पाच गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली. या गुन्ह्यांमधील ५ लाख ९४ हजार रुपयांचे सोने आणि २ लाख ४४ हजार रुपयांच्या तीन मोटारसायकल आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या. याशिवाय दोन अट्टल घरफोड्यांनाही पोलिसांनी अटक केली. अनुराग रवी सिसोदीया (२५) आणि कलीम नवाब अहमद खान (३0) ही आरोपींची नावे असून, दोघेही डायघरचे रहिवासी आहेत. या आरोपींनी शीळ डायघर, खडकपाडा, कोळसेवाडी, अंबरनाथ, मानपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७ घरफोड्यांची कबुली दिली. या गुन्ह्यांमधील १ लाख ५३ हजार रुपयांचे दागिने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चारही आरोपींकडून ९ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.मालमत्ता गुन्हे कक्षाच्या ठोस कारवाईमुळे गतवर्षी चोºयांचे प्रमाण तुलनेनी कमी झाले. याशिवाय मालमत्ताविषयक गुन्हेउघडकीस आणण्याचे प्रमाण57 टक्क्यांनी वाढले.