शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

संमेलनाचा निधी लटकला

By admin | Updated: February 22, 2017 06:27 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन १५ दिवस उलटले तरी संमेलनासाठी निधी देण्याचे कबूल

जान्हवी मोर्ये / डोंबिवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन १५ दिवस उलटले तरी संमेलनासाठी निधी देण्याचे कबूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अजूनही आयोजक संस्था आगरी यूथ फोरमला निधीचा धनादेश दिलेला नाही. निधी मिळावा, यासाठी फोरमचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींचे उंबरे झिझवत आहेत. मात्र, मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेचा त्यात अडसर येत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तरी हा निधी मिळणार की नाही, याविषयी फोरम साशंक आहे. साहित्य संमेलनासाठी आर्थिक सहकार्य म्हणून आमदार निधीतील काही निधी मिळावा, यासाठी फोरमने राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांशी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी १२ आमदारांनी निधी देण्याची तयारी दर्शविली होती. प्रत्येक आमदार किमान पाच लाख रुपये देणार होते. मात्र, संमेलनाच्या नियोजित तारखेच्या वेळीच महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यामुळे हा निधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला. पण आता हा निधी मिळावा, यासाठी फोरम त्यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. १२ आमदारांचे जवळपास ६० लाख रुपये फोरमला मिळणे अद्याप बाकी आहेत. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेने संमेलनासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. परंतु, संमेलनाच्या आधी महापालिकेने २५ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोरमकडे सुपूर्द केला होता. उर्वरित २५ लाखांचा निधी मिळलेला नाही. या निधीलाही कोकण शिक्षक आमदार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला. महापालिकांचे मतदान बुधवारी झाले. २३ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. त्यानंतर अपेक्षित ८५ लाखांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आचारसंहिता संपल्यावरही हा निधी वेळेत मिळेल का, याविषयी फोरम साशंक आहे. संमेलनासाठी एक कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जमा झाल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, अपेक्षित निधी धरून ही रक्कम होती की नाही, याविषयी त्यांनी काहीच स्पष्ट केलेले नव्हते. संमेलनासाठी उभारेलल्या पु. भा. भावे नगरीसाठी एक कोटी १३ लाख रुपये खर्च आला. संमेलनाचा ताळेबंद ५ मार्चपर्यंत सादर केला जाणार आहे. अपेक्षित निधी हाती न फोरमने आल्याने खर्च कसा फेडला, हा प्रश्नही अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे संमेलन संपल्यावरही संमेलनाच्या निधीचा प्रश्न अद्याप गाजतच आहे. संमेलनाचा खर्चात नेमकी कुठे व कशी काटकसर केली, हे फोरमने महामंडळास ताळेबंद सादर केल्यावरच स्पष्ट होईल. दरम्यान, आमदार त्यांचा शब्द पाळतात की नाही, याकडे आयोजकांसह महामंडळाचे लक्ष लागले आहे.मराठी भाषा दिन साजरा करणारआगरी युथ फोरमने नवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आता २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा अद्याप ठरलेली नाही. असे असले तरी दर्जेदार कार्यक्रम केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. च्सर्वसाधारणपणे संमेलन झाल्यानंतर आयोजक संस्थेकडून उपक्रम राबवणे शिथिल होते. मात्र, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी केवळ एक संमेलन घेऊन आगरी युथ फोरम थांबणार नाही, अशी ग्वाही दिली होती. दुसरीकडे, आयोजन समितीने साहित्य, संस्कृती आणि भाषासंवर्धनाचे कार्य सुरू ठेवावे. त्यासाठी पोषक कार्यक्रम घ्यावेत, असा सल्ला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिला होता.  २७ फेब्रुवारी हा कविवर्य वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन आगरी युथ फोरमने उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे. त्याची रूपरेषा लवकर ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ताळेबंद ५ मार्चपर्यंत देणारसाहित्य संमेलनाच्या खर्चाचे लेखापरीक्षण सुरू आहे. किती खर्च झाला, किती पैसे जमा झाले, याचा लेखाजोखा सुरू आहे. येत्या ५ मार्चपर्यंत साहित्य संमेलनाच्या खर्चाचा तपशील साहित्य महामंडळास सादर केला जाणार आहे. च्साहित्यिकांना दिलेले मानधन, त्यांचा प्रवास खर्च याचाही हिशेब सुरू असून चारपाच साहित्यिकांचे धनादेश देणे बाकी आहे. ते लवकरच दिले जातील. किती साहित्यिकांनी प्रवास खर्च व मानधन नाकारले, याची माहिती काढण्यात येत आहे, असे आयोजन समितीने स्पष्ट केले.