शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

गंधार गौरव सोहळ्याची नामांकने जाहीर, यंदाच्या गंधार गौरव पुरस्काराचे ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 17:30 IST

गंधार ही कलासंस्था गेली अनेक वर्षे बालरंगभूमीच्या सक्षमीकरणासाठी लहान मुलांना घेऊन अनेक नवनवीन उपक्र म करीत आहे.

ठळक मुद्देगंधार गौरव सोहळ््याची नामांकने जाहीरयंदाच्या गंधार गौरव पुरस्काराचे ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ१४ नोव्हेंबर रोजी गंधार गौरव सोहळा

ठाणे: गंधार कला संस्थेच्यावतीने गुरूवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. गडकरी रंगायतन येथे गंधार गौरव सोहळा २०१९ संपन्न होणार आहे. बालरंगभूमीच्या योगदानाबद्दल यंदाचा गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अशोक समेळ यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती गंधार कला संस्थेचे प्रा. मंदार टिल्लू यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.                       या सोहळ््यामध्ये सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या बालनाट्यांचा व संस्थेचा सन्मान केला जातो. सर्वोत्कृष्ट बालनाट्य, दिग्दर्शक, बालकलाकार, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा आणि वेशभूषा अशा दहा विभागांतील सर्वोत्कृष्ट कामासाठी गंधार तर्फे सन्मानित करण्यात येते. तसेच, दरवर्षी बालरंगभूमीच्या विशेष योगदानाबद्दल एका ज्येष्ठ रंगकर्मींचा गंधार गौरव सन्मान करण्यात येतो. आतापर्यंत रत्नाकर मतकरी, विद्याताई पटवर्धन आणि दिलीप प्रभावळकर यांना या गौरवाने सन्मानित केले आहे. यावर्षी या गंधार गौरव २०१९ चे मानकरी आहेत अशोक समेळ. आज पत्रकार परिषदेत या गंधार गौरव पुरस्काराची दहा विभागांतील नामांकने ज्येष्ठ वेशभूषाकार आणि परिक्षक प्रकाश निमकर, अभिनेते मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी ज्येष्ठ नाटककार डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत जाहीर केली. हा सोहळा सर्वांसाठी विनामूल्य असून ठाणेकर रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. टिल्लू यांनी केले. यावेळी गंधारचे सचिव बाळकृष्ण ओडेकर, खजिनदार वैभव पटवर्धन, सदस्य प्रा.संतोष गावडे, सुनील जोशी, अमोल आपटे, उमेश करंबेळकर, बी.एम.पाटील, सोनाली भोसले, थोरात, कांबळे उपस्थित होते.----------------------------------------

संस्थेचे नाव                        ठिकाण                         नाटकाचे नाव                नॉमिनेशन नाव१.नेपथ्यमोहिनीराज प्रोडक्शन-पुणे-सावली-पुष्कर देशपांडेसेक्रेड हार्टचे थिएटरआॅफ इनोव्हेशन -कल्याण- एक था टायगर-प्रतिश खंडागळे/ प्रांजल दामलेप्रियकलाकृती-पुणे-मॅडम-माणिक खटिंग/ उमेश गोडसे----------------------------------------------------------२. प्रकाशयोजनाअश्वमेध नाट्यसंस्था-कल्याण-आदिंबाच्या बेटावर-मयुरेश मोडकएम. बी. एन्टरटेनमेंट-ठाणे-अल्लादीन आणि जादुई जीन-चेतन पडवळसेक्रेड हार्टचे थिएटरआॅफ इनोव्हेशन- कल्याण-एक था टायगर- मकरंद मुकुंद/ऋषिकेश वायदंडे

----------------------------------------------------------३. रंगभूषासेक्रेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-अनिकेत काळोखेएम. बी. एन्टरटेनमेंट-ठाणे-अल्लादीन आणि जादुई जीन-करिष्मा वाघ-अभिषेक परबलकरनाट्यसंस्कार कला अकादमी-पुणे-नाच रे मोरा-शरदराज भगत----------------------------------------------------------

४. वेशभूषाराजयोग-कल्याण-राखेतून उडाला मोर-विजय घुले आणि पालकवर्गअश्वमेध नाट्यसंस्था-कल्याण-आदिंबाच्या बेटावर-रश्मी घुले आणि पालकवर्गसेक्रेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-सुरेश शेलार----------------------------------------------------------५. पार्श्वसंगीतराजयोग-कल्याण-राखेतून उडाला मोर-डॉ. सतिश साळुंखेनाट्यसंस्कार कला अकादमी-पुणे-नाच रे मोरा-आनंद देशमुखसेक्रेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-प्रितीश खंडागळे----------------------------------------------------------

६. लेखकप्रियकलाकृती-पुणे-मॅडम-ऋषिकेश तुराईसेक्रेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-सुरेश शेलारराजयोग-कल्याण-राखेतून उडाला मोर-डॉ. सतिश साळुंखे---------------------------------------------------------७. दिग्दर्शकअश्वमेध नाट्यसंस्था-कल्याण-आदिंबाच्या बेटावर-रश्मी घुलेएम. बी. एन्टरटेनमेंट-ठाणे-अल्लादीन आणि जादुई जीन-प्रेम कनोजिया आणि करिष्मा वाघसेक्रेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-सुरेश शेलार----------------------------------------------------------

८. बालकलाकार मुलगानवांकुर संस्कार मंच-कल्याण-तू बुद्धी दे-सोहम पळणीटकरसेक्रेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-हर्ष काटेराजयोग-कल्याण-राखेतून उडाला मोर-वेदांत झुंजारराव

----------------------------------------------------------९. बालकलाकार मुलगीसेक्रेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-अपुर्वा पडवळएम. बी. एन्टरटेनमेंट-ठाणे-अल्लादीन आणि  जादुई जीन- सिद्धी पवार 

मुक्तछंद एक व्यासपीठ-ठाणे-चॉकलेटचे झाड-हर्षित गायकवाड 

----------------------------------------------------------१०. बालनाट्यसेक्रेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगरअश्वमेध नाट्यसंस्था-कल्याण-आदिंबाच्या बेटावरप्रियकलाकृती-पुणे-मॅडम----------------------------------------------------------११. स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्डनाट्यसंस्कार कला-पुणे-नाच रे मोरा-शरदराज भगत----------------------------------------------------------विशेष लक्षवेधी अभिनयाची प्रशस्ती पत्रकश्रीजय देशपांडे (शिशू गजानन), श्रीनिवास ढवळे (बाल गजानन), वदाव्य गोळवलकर (कुमार गजानन), निमिषा मोराणकर (बचूंबा), अस्मि कायदे (किडकींबा)

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकTheatreनाटक