शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात जेष्ठात बरसला कोमसापचा वर्षा काव्यमहोत्सव, प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नायगावकर उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 17:09 IST

कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखा यांच्यावतीने मराठी ग्रंथ संग्रहाल येथे वर्षा काव्योत्सावाचे आयोजन केले होते. या कार्यक्र मासाठी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर प्रमुख पाहुने  म्हणून उपस्थित होते. तसेच, नवोदीत कवींची काव्यस्पर्धाही झाल्या.  

ठळक मुद्देजेष्ठात बरसला कोमसापचा वर्षा काव्यमहोत्सवप्रमुख पाहुणे म्हणून अशोक नायगावकर उपस्थितविशेष वक्ते म्हणून कविवर्य अशोक बागवे उपस्थित

ठाणे: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने मराठी ग्रंथसंग्रहालय,ठाणे येथे र 'वर्षा काव्यमहोत्सव" आयोजित करण्यात आला होता.याचे उद्घाटक सिने दिग्दर्शक शिरीष राणे यांनी केले. तर अध्यक्षपदी हास्य कवी अशोक नायगावकर आणि विशेष वक्ते म्हणून कविवर्य अशोक बागवे उपस्थित होते. 

    डायरेक्टर इन्फ्राटेक - एटी ऑईल व सिने निर्मात्या अलंक्रिता किशनराव राठोड यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले. तसेच कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर व कार्यवाह शशिकांत तिरोडकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. या काव्यमहोत्सवात ज्येष्ठ कवी अशोक बागवे, यांनी आठवणीतील अशोक नायगावकर यांच्याबद्दल आपल्या खास विनोदी शैलीत किस्से सांगत चिमटे घेत, कोपरखळ्या मारत रसिकांना पोट धरून हसवले. समारोपाच्या या कार्यक्रमात अशोक नायगावकरांच्या अध्यक्षीय भाषणानं वेगळीच रंगत आणली. कवी अशोक नायगावकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत कवींना मंत्रमुग्ध केलं. हास्यातून बरोबर मर्मावर बोट ठेवत प्रेक्षकांमध्ये हशा पिकवण्याचं काम कवी अशोक नायगावकर यांनी केलं,मधुसुधन नानिवडेकर,महेश केळुसकर,अनुराधा नेरूरकर यांच्यासह शिवाजी गावडे,कमलाकर राऊत,मकरंद वांगणेकर,सुवर्णा जाधव,स्नेहाराणी गायकवाड, सुनील पवार,कविता मोरवणकर, लता गुठे,रजनी निकाळजे ,कविता राजपूत ,छाया कोरेगावकर व सुनिता रामचंद्र या निमंत्रित कविंनी सामाजिक,पर्यावरण प्रेम ,शृंगार अशा विविध विषयावरील कविता सादर केल्या.भावविभोर करणा-या कविता सादर करून भावनांचे अनोखे रंग टिपले.तर तरुण कवींनी ,रसिकांनी ही भरभरून उत्स्फूर्त दाद दिली.या कार्यक्रमाला रसिकांची भरगच्च उपस्थिती होती. काव्यमहोत्सवाच्या प्रास्ताविकात कोमसापच्या अध्यक्षा मेघना साने यांनी तरूणांतील उत्तम कवींना व्यासपीठ मिळवून देणं हा उद्देश व्यक्त केला. त्यानुसार काव्य स्पर्धेतील कविंना मान्यवरांच्या बरोबरीने कविता सादर करता आल्या. त्याअनुषंगाने घेतलेल्या काव्य स्पर्धेत ययाती सोनवणे(प्रथम),ओंकार मोहिले (द्वितीय) व सुशांत भालेराव यांना(तृतीय) तर मानसी कुलकर्णी,संकेत म्हात्रे व अंजली सुरोशे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा बोर्डे व सतीश सोळांकुरकर यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक