शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
6
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
7
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
8
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
9
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
10
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
11
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
12
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
13
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
14
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
15
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
16
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
17
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
18
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
19
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
20
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा

अशोक खळदकर यांचे निधन

By admin | Updated: May 6, 2015 04:54 IST

जनसंघ- भाजपाचे कट्टर कार्यकर्ते आणि कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जावई अशोक खळदकर यांचे सोमवारी ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये रात्री १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

डोंबिवली : जनसंघ- भाजपाचे कट्टर कार्यकर्ते आणि कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जावई अशोक खळदकर यांचे सोमवारी ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये रात्री १० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिला खळदकर (६४), अर्चना अभय नाईक आणि मेघना श्रीराम कुडुस्कर या दोन मुली आणि नातू असा परिवार आहे. डोंबिवलीतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समर्थ संप्रदायाचे अप्पा धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, प्रिती सरदेशपांडे आदींसह प्रथम नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, मनसेचे नगरसेवक राजन मराठे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)जनसंघाचे कट्टर कार्यकर्तेनानासाहेबांसोबत खळदकर यांनी रामदास स्वामींच्या उपासना मार्गात अनेकांना मार्गदर्शन केले.त्यांचा जन्म सासावड येथिल एकतपूर येथे नोव्हेंबर १९४२ मध्ये झाला होता. बेस्ट मधील नोकरी निमित्त ते डोंबिवलीत १९६५ वास्तव्याला आले. तेव्हापासून ते डोंबिवलीकरच झाले. नानासाहेबांचे जावई या बरोबरच पूर्वीच्या जनसंघाचे-भाजपाचे कट्टर कार्यकर्ते अशी त्यांची ख्याती होती. १९७४ मध्ये डोंबिवली नगरपरिषदेत नगरसेवक म्हणूनही निवडून गेले होते.