शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेला गुंड आशीष गुप्ता पुन्हा एकदा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 22:17 IST

ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (20) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले

ठाणे, दि. 6 - ठाणे रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून हद्दपार केलेला आशीष बाकेलाल गुप्ता (20) या आरोपीला कोपरी पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. ठाणे जिल्ह्यात येण्याची त्याला मनाई असताना कोपरीतील सिद्धार्थनगर भागात फिरताना त्याला जेरबंद करण्यात आले.त्याच्याविरुद्ध ठाणे, कल्याण या रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाइल चोरी आणि प्रवाशांच्या जिवाला धोका पोहोचवणे, अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. कोपरी पोलीस ठाण्यातही खुनाच्या प्रयत्नासह हाणामारी आणि चोरीच्या गुन्ह्यांची नोंद त्याच्याविरुद्ध आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय पोलीस उपायुक्त समाधान पवार यांनी 24 जुलै 2017 रोजी मुंबईसह चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.मात्र, या आदेशाला धाब्यावर बसवून तो कोपरी परिसरात बिनधास्तपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कोर्डे, निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अशोक सावंत, जमादार राजा पाटील, हवालदार दत्ता पालांडे आणि तुकाराम डुंबरे यांच्या पथकाने 5 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोपरीतील महापालिका रुग्णालयासमोरून अटक केली. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती कोर्डे यांनी दिली. ‘‘आशीष गुप्ता याने रेल्वेत प्रवाशांचे मोबाइल चोरण्याबरोबरच प्रवाशांच्या जीवाला धोका पोहोचेल, अशी कृत्ये केली होती. त्यामुळेच त्याला मुंबई, ठाण्यातून हद्दपार केले होते. त्याच्याविरुद्ध रेल्वेसह कोपरीतही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.’’उत्तम सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस, ठाणे