शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीच्या वेळापत्रकाची प्राधिकरणाकडून ऐशीतैशी; बदलापूरकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:17 IST

भोंगळ कारभारामुळे संतापाचे वातावरण

बदलापूर : गेल्या सहा महिन्यांपासून निमूटपणे पाणीकपात सहन करणाऱ्या बदलापूर शहरातील नागरिकांना आता जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका बसत आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक पाळले जात नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जानेवारीपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यात मार्च महिन्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्याने कूपनलिका आटल्या आहेत. अशावेळी नागरिकांना फक्त जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा केल्या जाणाºया पाण्यावरच अवलंबून रहावे लागते.मार्च अणि एप्रिल महिन्यात पाणीटंचाईमुळे जीवन प्राधिकरणाने आपले पाण्याचे वेळापत्रक बदलले होते. शहरातील क्षेत्रफळाचे चार भागात विभाजन करून सोमवार आणि शुक्र वारी १५-१५ तासांची पाणीकपात लागू केली होती. त्याचवेळी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या अतिरिक्त ३ दशलक्ष लिटर पाण्याला मंजुरी मिळाल्याने पाणीकपातीत दिलासा मिळाला होता. मात्र पाऊस लांबल्याने सहा महिन्यांपासून सुरू असलेली पाणी कपात सुरूच आहे. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बेशिस्त कारभाराचा फटका आता नागरिकांना बसत असल्याने पाणीकपातीत भर पडत आहे.बदलापूरमधील वीज वितरण व्यवस्था खिळखिळी झाल्याचे सातत्याने समोर येत आहे. भोंगळ कारभाराने ग्राहक त्रस्त झाले आहेत.दहा दिवसांपासून दररोज मध्यरात्री खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. मध्यरात्री तासनतास अंधारात काढावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रिमझिम पावसातच ही अवस्था असेल तर चार महिने काय होणार, असा सवाल उपस्थित करत महावितरणच्या अभियंत्यांची उचलबांगडी करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.विजेच्या समस्येत वाढबदलापूरमध्ये यावर्षी विजेची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बदलापूर पश्चिमेतील जवळपास दीड लाख लोकसंख्येला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली, मांजर्ली, वडवली, वालीवली, हेंद्रे्रपाडा, बाजारपेठ, रमेशवाडी, सोनिवली आणि बदलापूर गावाला महावितरणच्या भोंगळ कारभाराचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई