शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वागळे आणि लोकमान्य नगर भागात कोरोनाचा चढता आलेख, दोन प्रभाग समितीत १२४ कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:54 IST

मागील काही दिवसात कळवा, मुंब्रा पेक्षा अधिकचे रुग्ण वागळे आणि लोकमान्य नगर भागात आढळून आले आहेत. नागरीकांच्या काही चुकांमुळे व पालिका प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतांना दिसत आहे.

ठाणे : कळवा आणि मुंब्य्रात ज्या वेगाने कोरोनाचा प्रार्दुभाव झाला त्यापेक्षा जास्तीच्या वेगाने लोकमान्य नगर आणि वागळे पट्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. या दोनही प्रभाग समितीमध्ये दिवसाला ८ ते १० रुग्ण वाढत आहेत. त्यातही सीपी तलाव परिसरातील रुग्णांची संख्या यात सर्वाधिकआहे. या दोनही प्रभाग समितीत मिळून १२४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. परंतु ते केवळ या दोनही भागातील प्रत्येकी एका व्यक्तीच्या चुकीमुळे आणि प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळेच हे झाल्याची बाब समोर आली आहे.           ठाणे शहरात आजच्या घडीला कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ३५० च्या घरात गेली आहे. परंतु मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा हा वाढतांना दिसून आला आहे. एककीडे कळवा, मुंब्रा भागात कोरोना वाढीचा वेग मंदावला असतांना दुसरीकडे लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती आणि वागळे इस्टेट प्रभाग समितीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. मागील तीन दिवसात या भागात रुग्णांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढतांना दिसत आहे. त्यातही वागळे इस्टेट या भागातील सीपी तलाव परिसरात सर्वाधीक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एका नागरीकाच्या चुकीमुळे ही वेळ येथील रहिवाशांवर आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या घरातीलच २५ ते ३० जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तीच्या माध्यमातून येथील नागरीकांना मोफत अन्नदान दिले जात होते. परंतु आता तेच किती महागात पडले आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याला नियमंत्रण कसे मिळयावयचे असा पेच पालिकेला सतावू लागला आहे. तर लोकमान्य नगर भागातील एका मृत व्यक्तीचा रिपोर्ट उशिराने आल्याने येथील रहिवाशांना आता पालिकेच्या चुकीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. शुक्रवार पर्यंत या दोनही प्रभाग समितीमध्ये प्रत्येकी ६२ रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजेच या दोन प्रभाग समितीमध्ये १२४ रुग्ण आहेत.दुसरीकडे मुंब्य्रात आतापर्यंत ५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नौपाडा, कोपरी प्रभाग समितीत आतापर्यंत ४१ जणांना कोरोना लागण झाली आहे. उथळसर ३४, कळवा ३३, वर्तकनगर २६, माजिवडा मानपाडा २३ आणि दिवा प्रभाग समितीत ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या