शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा नसल्याने जीपने जाताना अपघातात सहा ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 09:02 IST

भिवंडीजवळ जीपला ट्रेलरची धडक; मृतांमध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थी

मेघनाथ विशे

पडघा : मुंबई- नाशिक महामार्गावर पडघ्याजवळील खडवली फाटा येथे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता प्रवासी वाहतूक करणारी काळी- पिवळी जीप व ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात जीपमधील सहा जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून एका विद्यार्थिनीला किरकोळ  दुखापत झाली आहे. रिक्षा नसल्याने जीपने पडघ्याहून खडवली स्टेशनवर जात असताना हा अपघात झाला.

पडघा बसस्थानकावर खडवलीसाठी रिक्षा नसल्याने विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांनी पडघा- भिवंडी मार्गावर चालणाऱ्या जीपचालकाला खडवली स्टेशन येथे सोडावे, अशी विनंती केली. मात्र, महामार्गाहून खडवलीकडे रस्ता ओलांडत असताना खडवली फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रेलरने जीपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ७० ते ८० फूट अंतरापर्यंत ट्रेलरने जीपला फरफटत नेले. 

कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा  n अपघातात चिन्मयी शिंदे (१५, रा. वाहुली-पडघा), रिया परदेशी (पडघा),  प्रज्वल फिरके (१८, पडघा),  चैताली पिंपळे (२८, पडघा), संतोष जाधव (५०, पडघा), वसंत जाधव (५०, भातसई) यांचा मृत्यू झाला. जीपचालक जावेद शेख, दिलीप विश्वकर्मा, चेतना जरे, कुणाल भामरे गंभीर जखमी झाले आहेत. n जान्हवी वाळंज ही किरकोळ जखमी झाली. ट्रेलरचालक शिवशंकर प्रजापती, पडघा टोलनाका रोडचे कंत्राटदार, सिगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कंत्राटदार तसेच रॉकटँक कंपनीचे रोड कंत्राटदार यांच्यावर फिर्यादी भगवान सांबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

खडवली फाटा अपघाताचे केंद्रमुंबई- नाशिक महामार्गावर खडवली फाटा हे अपघाताचे ठिकाण मानले जाते. दररोज येथे किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ८ जुलैला येथेच एका ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघातbhiwandiभिवंडी