शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

आचारसंहिता लागताच महापालिका प्रशासनाची नखं आली बाहेर ; शिवसेना शिंदे गटाच्या कंटेनर शाखांसह राष्ट्रवादी च्या बेकायदा कार्यालयांवर कारवाई

By धीरज परब | Updated: March 17, 2024 16:08 IST

गेल्या वर्षी नोव्हेम्बर महिन्यात भाईंदर पूर्व भागातील सरस्वती नगर मैदान पोलीस चौकी लगत , नवघर नाका , गोडदेव नाक्या जवळ , गोल्डन नेस्ट सर्कल जवळ , इंद्रलोक नाका व मीरारोडच्या पूनम गार्डन भागात एकाच दिवशी शिवसेना शिंदे गटाच्या ६ कंटेनर ंशाखा सुरु केल्या गेल्या .

मीरारोड - शनिवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच आता पर्यंत दबलेल्या मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाने नखं काढण्यास सुरवात करत शिवसेना शिंदे गटाच्या ६ पेक्षा जास्त कंटेनर शाखांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटच्या अनधिकृत कार्यालयावर तोडक कारवाई केली आहे . 

गेल्या वर्षी नोव्हेम्बर महिन्यात भाईंदर पूर्व भागातील सरस्वती नगर मैदान पोलीस चौकी लगत , नवघर नाका , गोडदेव नाक्या जवळ , गोल्डन नेस्ट सर्कल जवळ , इंद्रलोक नाका व मीरारोडच्या पूनम गार्डन भागात एकाच दिवशी शिवसेना शिंदे गटाच्या ६ कंटेनर ंशाखा सुरु केल्या गेल्या .

रस्ते - पदपथ वर ठेवलेल्या सदर बेकायदा कंटेनर शाखा असून त्यावर कारवाईची मागणी भाजपा , शिवसेना ठाकरे गट , मनसे , काँग्रेस  आदींनी महापालिके कडे केली होती . मनसेने तर अदानी वीज कंपनी कडे तक्रारी करून कंटेनर शाखेला केलेला बेकायदा वीज पुरवठा खंडित करायला लावला होता . कंटेनर शाखां विरोधात तक्रारी करून देखील महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी मात्र कारवाई न करता शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर महासभेच्या ठराव नुसार कारवाई करणार अशी भूमिका घेतली होती . 

तर तक्रार करणाऱ्या शिवसेना ठाकरे गट , मनसे , काँग्रेस चे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या बेकायदा वा वाढीव कामांवर कारवाईची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली होती . त्या नंतर मात्र कंटेनर शाखां विरुद्ध राजकीय पक्ष गप्प बसल्याचे चित्र दिसू लागले . तर आणखी काही ठिकाणी नव्याने कंटेनर शाखा सुरु करण्यात आल्या होत्या . दरम्यान पालिकेने नुकतीच काही कंटेनर शाखांना काढून घेण्याची नोटीस बजावली होती . 

शनिवार १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच आयुक्त काटकर यांच्या आदेशा नुसार महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त , विभाग प्रमुख व प्रभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळूनच राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर तोडक कारवाई सुरु केली आहे . 

शनिवारी भाईंदर पूर्वेच्या महात्मा ज्योतिबा फुले ( केबिन रोड ) मार्गावरील, इंद्रलोक नाका , सचिन तेंडुलकर मैदान जवळ , नवघर नाका ,  गोल्डन नेस्ट - आझाद नगर  व मीरारोडच्या मीनाताई ठाकरे सभागृह जवळील पालिकेच्या रस्ता -  पदपथ आदी सार्वजनिक असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या ६ कंटेनर शाखांवर पालिकेने कारवाई केली . मीरारोडच्या हाटकेश भागातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनधिकृत कार्यालयावर सुद्धा पालिकेने कारवाई केली . 

एरव्ही सामान्य लोकांची बेकायदा कच्ची व पक्की बांधकामे तोडणाऱ्या महापालिकेची हि राजकीय  पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवरील कारवाई सुरु राहणार कि थांबणार ? या कडे लोकांचे लक्ष लागले आहे .