शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हाडा’चे घर लागताच आनंदाश्रूंना आला पूर; ठाण्यात ५,३११ सदनिकांची सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 07:53 IST

कोकण मंडळाची सोडत गेल्या काही वर्षांपासून म्हाडा ठाण्यात काढत आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश घरांचा या सोडतीमध्ये समावेश होता.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाची ५ हजार ३११ सदनिका विक्रीची संगणकीय सोडत ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे शनिवारी संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडतीला प्रारंभ झाला. या सोडतीमध्ये सभागृहात उपस्थित असलेल्या विजेत्यांची संख्या आजवरच्या सोडतीच्या तुलनेत लक्षणीय होती. घर लागण्याकरिता दीर्घकाळ प्रतीक्षा केलेल्या काहींना लॉटरी लागताच आनंदाश्रू अनावर झाले.

कोकण मंडळाची सोडत गेल्या काही वर्षांपासून म्हाडा ठाण्यात काढत आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश घरांचा या सोडतीमध्ये समावेश होता. अर्जदार अनेक महिन्यांपासून सोडतीच्या प्रतीक्षेत होते. शनिवारी सोडत असल्याने अर्जदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सोडतीची घोषणा जसजशी होत होती तसतशी उपस्थितांची उत्सुकता शिगेला पोहोचत होती. घर  लागलेले अर्जदार आनंद व्यक्त करीत होते. सोडत विजेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन ‘म्हाडा’मार्फत अभिनंदन करण्यात आले. सोडतीत विजयी झाल्याचे एसएमएस येताच मंचावर जाण्यासाठी विजेत्यांची रांग लागली. ‘म्हाडा’च्या आजवरच्या ऑनलाइन सोडतीमध्ये सर्वाधिक विजेते यावेळी उपस्थित होते. 

सरकारी कोट्यात घर मिळाले. म्हाडाच्या घरासाठी गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने फॉर्म भरत होतो. आता घराची लॉटरी लागल्याने आनंद झाला.     - गजानन शिंदे

सहा वर्षांपासून अर्ज करीत होते. नंबर लागत नसल्याने त्यांची निराशा झाली. मी पहिल्यांदा अर्ज केला आणि स्वप्नातील घर मिळाले. हे घर माझ्या पतीला भेट देणार आहे.    - रश्मी मोरे 

चार-पाच वर्षांपासून घरासाठी अर्ज भरत होतो. घराच्या लॉटरीसाठी सहा वेळा अर्ज केला होता. सातव्यांदा यश मिळाले, स्वप्नातील घर साकार झाले.- श्याम वाटांबे, मुंबई उपनगर जिल्हा दंडाधिकारी कार्यालय

नौदलाने अन्न आणि कपडे दिले; पण घरासाठी १० वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. आता लॉटरी लागली आहे. त्याबद्दल मी राज्य सरकारचा आभारी आहे.  - अजय तिवारी, नौदल अधिकारी

सरकारी कोट्यात घर मिळाले. गेल्या वर्षीच म्हाडात रुजू झालो. या वर्षी फॉर्म भरला आणि लगेच घर लागले याचा आनंद आहे. - यशवंत कांगणे, कनिष्ठ अभियंता, म्हाडा

टॅग्स :mhadaम्हाडा