शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्त्तर म्हणून 'तो' खाडीत पडूनही सुदैवाने बचावला; पोलिसांनी वाचविले प्राण

By जितेंद्र कालेकर | Updated: January 8, 2023 19:00 IST

ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा भागातील जोशी बेडेकर कॉलेजच्या मागे असलेल्या खाडीमध्ये एक तरुण पडल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाली.

ठाणे - केवळ  दैव बलवत्तर म्हणून राजा बाबू (२०, खारटन रोड, ठाणे, मुळ रा. हिमाचल प्रदेश) हा तरुण शनिवारी रात्रभर खाडीच्या दलदलीत पडूनही आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या तातडीच्या मदतीमुळे सुदैवाने बचावला. तो खाडीमध्ये अडकल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांकडून मिळाल्यानंतर रविवारी सकाळी या पथकाच्या जवानांनी त्याला खाडीतून सुखरुप बाहेर काढले.

ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा भागातील जोशी बेडेकर कॉलेजच्या मागे असलेल्या खाडीमध्ये एक तरुण पडल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांना त्या भागात डुक्कर पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांकडून ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलिस हवालदार विठ्ठल पाबळे यांनी ही माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाºयांनी तसेच ठाणेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी किनाºयापासून आतील खाडीच्या दलदलीमध्ये राजा बाबू हा अडकल्याचे आढळले. तो खाडीतील एका झाडाला धरुन कसाबसा स्वत:चा तोल सावरत होता. त्याला या पथकांनी मोठया कौशल्याने खाडीमधून बाहेर काढले. या घटनेत त्याच्या पाठीला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राकेश शेवाळे यांनी दिली. 

शनिवारी रात्रीच खाडीत अडकला

राजा बाबू शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान लघुशंकेसाठी खाडीच्या दिशेने गेला. त्याचवेळी तो अडकला. त्याला खाडीतील चिखल आणि दलदलीचा अंदाज न आल्यामुळे तो तसाच  चिखलामध्ये रुतून राहिला. संपूर्ण रात्र या खाडीमध्ये काढल्यानंतर तो थंडीने पूर्णपणे गारठला होता. सुदैवाने, डुक्कर पकडण्यासाठी गेलेल्या काही तरुणांचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि ही माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने मात्र या दलदलीतून रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सुखरुप बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचू शकले. ठाण्यात एका बांधकामाच्या ठिकाणी तो मजूराचे काम करीत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे