शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 05:47 IST

उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधील प्रवाशांना गावाला जाताना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटणा-या चौघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

डोंबिवली : उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमधील प्रवाशांना गावाला जाताना मारहाण करून त्यांचा ऐवज लुटणा-या चौघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मोहम्मद चाँद लुले खान (२३), अफजल कासीम खान (२२), दिन मोहम्मद अयुब खान (३५), फरमान रज्जब खान (२४) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. चौघेही मुंबईत नागपाडा येथे वास्तव्याला असल्याचे पोलिसांनी सांगितले.यासंदर्भात निलेश विजेंद्र प्रसाद (२३, रा. उत्तर प्रदेश) यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश २३ मे रोजी त्यांचे वडील, दोन मित्रांसमवेत गावी जाण्यासाठी कल्याण रेल्वेस्थानकात आले होते.तिकीट काढण्यासाठी उभे असताना दोन अनोळखी इसमांनी कुर्ला येथे गेल्यावर जागा मिळेल, असे सांगून लोकलने रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांना कुर्ला येथे घेऊन गेले. कुर्ला स्थानकातून कुर्ला टर्मिनस येथे जाण्यासाठी अंधारातून रेल्वेरुळांमधून मार्ग काढताना त्या अनोळखी इसमांनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांना फोनवर संपर्क करून बोलावून घेतले. त्यानंतर त्या चौघांनी निलेशसह चौघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच धारदार चाकूने वार करत दुखापत केली.त्यानंतर, त्यांच्याजवळील तीन मोबाइल, रोख रक्कम घेऊन पोबारा केला. पोलिसांनी कल्याण रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून संशयितांची माहिती घेण्यात आली. पोलिसांच्या खबऱ्यांकडून समजले की, २०१८ मध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले हे चौघे आरोपी सध्या जामिनावर सुटले असून नागपाडा, मुंबई येथील रहिवासी आहेत.कुर्ला आणि कल्याण स्थानकांत पोलिसांनी सापळा रचला असता २६ मे रोजी कल्याण रेल्वेस्थानकात चोरीच्या उद्देशाने सावज हेरत असताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी वरील गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी अशाप्रकारे आणखी चार गुन्हे केले असल्याचे सांगितले.>बुधवारपर्यंत कोठडीसीसीटीव्हीत मिळालेले फुटेज आणि प्रत्यक्ष आरोपी हेच असल्याची खातरजमा केल्यावर त्या चौघांना मंगळवारी अटक केली. बुधवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी चार गुन्हे केल्याची कबुली दिली असून तीन मोबाइल, १६ हजार ५०० रुपये रोख रक्कम, दोन चाकू असा एकूण २९ हजार ५०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

टॅग्स :Arrestअटक