शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मांडुळ सर्पाच्या तस्करीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:03 IST

डोंबिवली: दुर्मिळ मांडुळ जातीचे सर्प औषधी पदार्थ व काळी जादुसाठी विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा लावून अटक केली. कल्याण-शीळ मार्गावरील काटई नाका परिसरात ही कारवाई करण्यात आली. यात तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन आणि दोन सर्प पोलिसांनी जप्त केले आहेत.

ठळक मुद्देकल्याण गुन्हे शाखेची कारवाईदोन सर्प जप्त

डोंबिवली: दुर्मिळ मांडुळ जातीचे सर्प औषधी पदार्थ व काळी जादुसाठी विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा लावून अटक केली. कल्याण-शीळ मार्गावरील काटई नाका परिसरात ही कारवाई करण्यात आली. यात तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन आणि दोन सर्प पोलिसांनी जप्त केले आहेत.नवनाथ विश्वास दायगुडे, कृष्णा पारटे आणि प्रविण चव्हाण अशी अटक आरोपींची नावे आहेत हे सर्वजण पुणे आणि रायगड परिसरातील रहिवाशी आहेत. कल्याण-शीळ रोड काटई टोल नाका येथे काही व्यक्ती मांडुळ जातीचा वन्यसर्प विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहीती खब-यामार्फत गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष शेवाळे, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, विश्वास चव्हाण, पोलिस नाईक राजेंद्र खिलारे, सतिश पगारे, प्रकाश पाटील, राजेंद्र घोलप आणि हर्षल बंगारा आदिंच्या पथकाने परिसरात सापळा लावला होता. या पथकात वनरक्षक संतोष पालांडे हे देखील सहभागी झाले होते. खब-यामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार आलेली स्कॉर्पिओ गाडी पथकाकडून अडविण्यात आली. गाडीची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिक गोणीत असलेले २ मांडुळ जातीचे सर्प आढळुन आले. वन अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार हे सर्प सुरक्षित ठेवून त्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी सर्पमित्र वैभव कुलकर्णी यांच्या निसर्ग विज्ञान संस्थेकडे सुपुर्द करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक शेवाळे यांनी दिली. या सर्पांची किंमत सुमारे २५ लाख रूपये असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना अधिक भाव असल्याचेही त्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्प कोणाला विक्री करण्यासाठी आले होते याचा तपास सुरू असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली