शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 05:11 IST

मंगतपाल सिंग याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे : फेसबुकच्या माध्यमातून कल्याणच्या विवाहितेशी पंजाबच्या तरुणाने सलगी केली. तसेच ठाण्यातील एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी घडला होता. मंगतपाल सिंग याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.कल्याणच्या या विवाहितेसोबत पंजाबच्या मंगतपाल याने मैत्री कली. त्याने तिला २ आॅक्टोंबर २०१७ रोजी ठाणे रेल्वे स्थानकात बोलविले. तिथे भेट झाल्यानंतर बाळकूम येथील ‘राज रेसिडेन्सी’ या हॉटेलमध्ये शिपींग कंपनीचा मॅनेजर आला असून तुझ्या नोकरीची बोलणी करून देतो, अशी बतावणी केली. हॉटेलात शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. त्याचे चित्रणही मोबाईलमध्ये केले. ती शुद्धीवर आल्यावर मंगतपाल तिचे चित्रण मोबाईलमध्ये करीत असल्याचे तिच्या लक्षात आले. हा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. भेदरल्यामुळे तिने याची वाच्यता केली नाही. त्यानंतरही मंगतपाल तिला ब्लॅकमेल करू लागला. अश्लील फोटो पाठवू लागला. या प्रकाराची माहिती तिने एका समाजसेवकाच्या मदतीने १५ जून २०१८ रोजी गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना सांगितली.कापूरबावडी पोलिस ठाण्यात मंगतपालविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्याचा शोध घेतला. तेंव्हा तो पंजाबमधील त्याच्या मुळ गावी असल्याची माहिती समोर आली. ठाणे पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागल्यानंतर तो सतत घराबाहेर राहू लागला. त्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांनी त्याला १३ सप्टेंबर रोजी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले.नोकरीचे आमिषकल्याणच्या या विवाहितेसोबत पंजाबच्या राजपूर जिल्ह्यातील मंगतपाल याने मैत्री करून विश्वास संपादनानंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांकही मिळविला. तिच्याशी संपर्क साधून तिला कंपनीत रिसेप्शनिस्टची कायम नोकरी लावण्याचेही अमिष दाखविले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळthaneठाणे