शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीही मुलगीच झाल्याने केली हत्या, अटकेतील आई वडिलांनी दिली कबूली

By जितेंद्र कालेकर | Updated: April 15, 2024 21:00 IST

मुंब्रा पोलिसांच्या तपासात उघड

ठाणे: चार मुलांनंतर पाचवीही मुलगीच झाली, तिचा सांभाळ कसा करायचा? मोठी झाल्यावर तिच्या लग्नात हुंडा कसा द्यायचा? अशा अनेक प्रश्नांनी घर केल्यामुळे आपण पाचव्या दीड वर्षीय लबीबाची हत्या केल्याची कबूलीच जाहीद शेख (३८) आणि त्याची पत्नी नूरानी (२८) यांनी दिल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

अवघ्या दीड वर्षीय मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिला या दाम्पत्याने गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तिला आजार झाल्याचा बहाणा करीत तिच्यावर उपचार केले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा १८ मार्च २०२४ रोजी मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर १९ मार्च रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील कब्रस्थानामध्ये तिला परस्पर दफनही केले होते. तिच्या संशयास्पद मृत्यूची माहिती तिच्या फोटोसह संतोष महादेव नामक व्यक्तीने ४ एप्रिल २०२४ रोजी मुंब्रा पोलिसांना दिली होती.

त्याच आधारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय दवणे, सहायक पोलिस निरीक्षक कोरडे यांच्या पथकाने केला. मुलीचा मृतदेह दफनभूमीतून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर विधीवत कौसा कब्रस्थानात ते दफन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्यावर शस्त्राने वार केल्याचे आढळले. याच प्रकरणात जाहीद आणि नूरानी या दाम्पत्याला १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दाम्पत्याने अखेर दोन मुले आणि तीन मुली असल्यामुळे त्यातील या धाकटया मुलीचा खून केल्याची कबूली दिली. यातील पहिल्या मुलीचाही खूनाचा प्रयत्न केला होता, अशी कबूलीही त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी