शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 22:34 IST

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नव बाल विद्यामंदिर स्कूल या शाळेत मुख्याध्यापक पद उपभोगणा-या कल्लूराम जैसवार याला कापूरबावडी पोलिसांनी निवृत्तीनंतर सहा वर्षांनी अटक केली आहे. निवृत्तीच्या कागदपत्रांची पडताळणी करतांना तब्बल २४ वर्षांनी संस्थेच्या निदर्शनास हा प्रकार आला. २६ वर्षे शासन आणि संस्थेला अंधारात ठेवल्याप्रकरणी जैसवारविरुद्ध संस्थेने फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे२४ वर्षांनी संस्थेच्या निदर्शनास आला प्रकार२६ वर्षे शासन आणि संस्थेला ठेवले अंधारातनिवृत्तीनंतर सहा वर्षांनी झाली अटक

ठाणे : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेची पदवी आणि कलाध्यापक पदवी (बीएड) या वर्गांची बनावट प्रमाणपत्रे बनवून त्याआधारे ठाण्याच्या नव बाल विद्यामंदिर स्कूल या शाळेमध्ये मुख्याध्यापकपद भोगून शासनाची तसेच शैक्षणिक संस्थेची फसवणूक करणा-या कल्लूराम जैसवार (६४) याला कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील हरेकृष्ण एज्युकेशन सोसायटीचे मुख्य विश्वस्त तथा अध्यक्ष लक्ष्मीचंद आहुजा यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार १९८७ मध्ये त्यांनी त्यांच्या संस्थेअंतर्गत आझादनगर येथील नव बाल विद्यामंदिर ही शाळा चालवण्यासाठी घेतली. तेव्हापासूनच कल्लुराम जैसस्वार हे मुख्याध्यापक म्हणून तिथे कार्यरत होते. १० मे २०१३ रोजी ते या पदावरून निवृत्तही झाले. त्यापूर्वीच २०११ मध्ये त्यांच्याकडे संस्थेने निवृत्तीनंतर देण्यात येणारा भविष्य निर्वाह निधी तसेच निवृत्तीवेतनासाठी बीए आणि बीएड पदवीच्या मूळ प्रमाणपत्रांची विचारणा केली. तेव्हा त्यांनी संस्थेकडे मूळ प्रमाणपत्रांऐवजी झेरॉक्स प्रती सुपूर्द केल्या. आपले संपूर्ण रेकॉर्ड हे शिक्षण विभागाकडे जमा केलेले असल्याचाही त्यांनी दावा केला. यातूनच संस्थाध्यक्ष आहुजा यांच्यासह शालेय प्रशासनाला याबाबत संशय आला. याचीच पडताळणी करण्यासाठी ३१ मे २०११ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील कार्यालयात त्यांनी जैसवार यांनी संस्थेला दिलेली बीए आणि बीएडच्या पदवीच्या प्रमाणपत्रांबाबत चौकशी केली. तेव्हा, जैसवार यांनी दिलेली प्रमाणपत्रे बोगस असल्याचे लेखी पत्रच मुंबई विद्यापीठ प्रशासनाने २२ जून २०११ रोजी दिले. तेव्हाच जैसवार याने बोगस व बनावट पदवीच्या आधारावर मुख्याध्यापक या पदावर राहून शासनाची आणि संस्थेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, संस्थेनेही त्यांची या प्रकरणात चौकशी केली. पण, मूळ प्रमाणपत्रे सादर करण्याच्या अधीन राहून ते २०१३ मध्ये निवृत्त झाले. संस्थेने केलेल्या चौकशीमध्येही ते कालांतराने दोषी आढळले. १९८७ ते १० मे २०१३ या कालावधीमध्ये नव बाल विद्यामंदिरमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे २६ वर्षे मुख्याध्यापकपद उपभोगून शासनाची आणि संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थाध्यक्ष आहुजा यांनी अखेर १३ जुलै २०१९ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो दाखल होताच निवृत्तीनंतर सहा वर्षांनी जैसवार याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या सर्व प्रमाणपत्रांची आणि इतरही कागदपत्रांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक एन.बी. गिरासे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी