शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कायदा कसाही मोडू शकतो याच हेतूने अटक; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

By अजित मांडके | Updated: November 12, 2022 18:00 IST

तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत दाखिवण्यात आलेल्या चुकीच्या विकृतीला विरोध केला होता म्हणूनच आमच्यावर कायद्याचा कोणत्याही प्रकारचा आधार न घेता, चुकीचे कलम लावून महाराष्ट्राला दाखविण्यासाठी आम्ही कायदा कसाही मोडतोड करु शकतो, फेकू शकतो हे उदाहरण सेट करण्यासाठीच ही अटक करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यात पोलिसांचा काहीही संबंध नव्हता, त्यांच्यावर केवळ दबाव होता, म्हणूनच त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण होत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार आणि त्यासाठी आम्हाला ३६५ दिवस जरी जेल मध्ये टाकले तरी त्याचे आम्ही स्वागत करु असे आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगत एक प्रकारे आव्हान दिले. त्यामुळे तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.

विवियाना मॉल मधील हरहर महादेव चित्रपटाच्या वेळेस मारहाण प्रकरणी आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांची शनिवारी जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना हा आरोप केला. कलम ४१ (ए) अन्वये पहिली नोटीस आल्यानंतर सांयकाळी 5 वाजेर्पयत चौकशीला हजर राहावे असे सांगण्यात आले होते. मात्र दोन वाजता नोटीस दिल्यानंतर अडीच वाजता अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता, अटक करण्यापूर्वी नियमानुसार ७२ तासाची संधी देणो अपेक्षित होते. त्यावेळेस माङो म्हणने मांडता आले असते, मात्र तसे न करता केवळ दबावापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यात शुक्रवारी अटक झाल्यानंतर कोर्टात हजर करता आले असते मात्र सांयकाळ र्पयत वेळ काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ जेलमध्ये कसे ठेवता येईल याची तजवीज करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

हरहर महादेव या चित्रपटात कशा पध्दतीने चुकीचा इतिहास दाखविण्यात आला, याचा पुरावाच यावेळी त्यांनी सादर केला. या चित्रपटात बाजीप्रभु देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दाखविण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीचा इतिहासाला विरोध केला म्हणून जर आम्हाला अटक झाली असेल तर ती आम्हाला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु चुकीचे कलम लावून आव्हाडांना अटक कशी करता येईल याचा प्रयत्न वरीष्ठ पातळीवर झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहासाचे विकृतीकरण होऊ नये यासाठी आम्ही हा विरोध केला होता, आणि विरोध करत राहू असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी विरोध करायला हवा होता

ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहित नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का? त्यात एवढे विकृतीकरण होत असतांना राज ठाकरे याच्यावर काहीच बोलत का नाही? असा सवाल त्यांनी केला. ते खुप हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी अशा चित्रपटांना थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही माफी मागावी, तुमचा चित्रपटातील आवाज मागे घ्यावा, असे मी सांगणार नाही, मात्र एखादी चुकीची गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर होत असेल तर याला कुठेतरी विरोध झालाच पाहिजे असेही त्यांनी सांगितले. माराहाणीची तक्रार झाली, मात्र ज्याला मारहाण झाली त्यानेच या प्रकरणात आव्हाड यांचा संबध नसल्याचे सांगितले. तर मॉल चालकाने देखील कुठेही तक्रार केलेली नाही. परंतु मला कसे अडकावयचे यासाठीच प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड