शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या व्यापा-याला धमकवणा-याला अटक, आरोपी सराईत गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:20 IST

एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून १० लाख रुपयांची खंडणी उकळणा-या ठाण्यातील एका आरोपीस खंडणीविरोधी पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली.

ठाणे : धान्याचा काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने, अडचणीत सापडलेल्या मुंबई येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून १० लाख रुपयांची खंडणी उकळणा-या ठाण्यातील एका आरोपीस खंडणीविरोधी पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली. आरोपीला न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.स्वस्त धान्याचा काळाबाजार केल्याच्या गुन्ह्यामध्ये मुंबईतील साकीनाका येथील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे नाव समोर आले होते. या गुन्ह्यामध्ये संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे वाहन वापरण्यात आले होते. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यात नेहमी जाणे-येणे असणाºया या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची माहिती चरई येथील एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंजजवळ राहणाºया महेश अमृतलाल ठक्कर याने काढली. त्यानंतर, महेश ठक्करने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास धमक्या देणे सुरू केले. तुमचे सगळे धंदे मला माहीत आहेत. तुमच्याकडे २० गाड्या आहेत. त्या कशा घेतल्या, हेसुद्धा मला माहीत आहे, असे धमकावून महेशने ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. आपल्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने सांगितल्यानंतर, महेशने २० लाख रुपयांची मागणी केली. खंडणी न दिल्यास पोलिसांना सांगून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्याची धमकीही महेशने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास दिली. व्यावसायिकाने पुन्हा विनवण्या केल्यानंतर, अखेर १० लाख रुपयांची खंडणी देण्याचे निश्चित झाले. त्यापैकी दीड लाख रुपये रोख व्यावसायिकाने महेशला दिले. उर्वरित ८ लाख ५० हजार रुपये देण्यासाठी शनिवारचा दिवस निश्चित करण्यात आला होता. खंडणीची रक्कम घेण्यासाठी कापूरबावडी नाक्यावरील एका हॉटेलमध्ये महेश ठक्कर शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येणार होता. तत्पूर्वी या व्यावसायिकाने ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी याची पडताळणी केली. आरोपी महेश ठक्कर याच्याविरुद्ध आधीच ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Arrestअटकthaneठाणे